Join us
Daily Top 2Weekly Top 5

​Exclusive : मृणाल दुसानिसची अस्सं सासर सुरेख बाई मधून एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 14:52 IST

अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतील जुई म्हणजेच  मृणाल दुसानिस प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षक तिच्या ...

अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतील जुई म्हणजेच  मृणाल दुसानिस प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षक तिच्या अभिनयाचे कौतुक करत आहे. ही मालिका देखील प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेचे अनेक चाहते आहेत. पण या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. प्रेक्षकांची लाडकी जुई म्हणजेच मृणाल दुसानीस ही मालिका सोडत असून या मालिकेत प्रेक्षकांना आता नवीन जुई पाहायला मिळणार आहे.मृणाल दुसानीसचे फेब्रुवारी 2016 मध्ये नीरज मोरेशी लग्न झाले होते. नीरज हा पुण्याचा असला तरी तो सध्या अमेरिकेत राहात आहे. अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेच्या चित्रीकरणात मृणाल व्यग्र असल्याने तिला नीरजला वेळ देता येत नव्हता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी मालिकेच्या चित्रीकरणातून ब्रेक घेऊन ती अमेरिकेला गेली होती. तिथे त्यांनी एकमेकांसोबत खूप चांगला वेळ देखील घालवला. पण मुंबईत परत आल्यानंतर ती पुन्हा तिच्या चित्रीकरणात बिझी झाली. मात्र आता नीरजला वेळ देण्यासाठी तिने ही मालिका सोडली आहे. मृणालने कलर्स मराठी वाहिनीसोबत मालिका सोडण्याबाबत काही दिवसांपूर्वी चर्चा केली होती. वैयक्तिक कारणांसाठी तिला मालिका सोडायची असल्याचे तिने वाहिनीला सांगितले होते. वाहिनीच्या मंडळींनीदेखील तिची समस्या जाणून घेत तिच्या निर्णयाला होकार दिला. मृणाल आता तिच्या पतीसोबत अमेरिकेला जाणार असल्याचे समजतेय. ती काहीच दिवसांत अमेरिकेला रवाना होणार असल्याचे म्हटले जात आहे.अस्सं सासर सुरेख बाईमध्ये मृणालची जागा आता सायली पाटील घेणार आहे. ती या मालिकेत प्रेक्षकांना जुईच्या भूमिकेत दिसणार आहे. Also Read : सोनूनंतर आता मुन्नू तुझा माझ्यावर भरोसा नाही का?