Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बेहद ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 16:19 IST

बेहद ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील माया या व्यक्तिरेखेमुळे जेनिफर विंगेटला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेतील ...

बेहद ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील माया या व्यक्तिरेखेमुळे जेनिफर विंगेटला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. या मालिकेत सध्या प्रेक्षकांना तिचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात मायाने तिचे संपूर्ण केस कापून टक्कल केले आहे. मायाचा हा लूक पाहिल्यानंतर जेनिफरने या कार्यक्रमासाठी खरंच टक्कल केले का हा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे तिने या गोष्टीचा खुलासा केला आहे. ती या कार्यक्रमासाठी विग वापरत असल्याचे तिने तिच्या फॅन्सना सांगितले होते आणि तिच्या या लूकचे सर्व श्रेय तिने तिच्या मेकअपमनला दिले होते.बेहद या मालिकेत मायाचा मृत्यू झाल्याचे अर्जुनला वाटले होते. पण माया जिवंत आहे हे कळल्यानंतर या मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट हा असतो, त्याचप्रमाणे आता प्रेक्षकांचा हा आवडता कार्यक्रम संपणार असल्याची चर्चा आहे. बेहद या मालिकेच्या फॅन्ससाठी खरे तर ही अतिशय वाईट बातमी आहे. बेहद हा कार्यक्रम पुढील महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. इंडिया फोरम या वेबसाईटच्यामते माया जिवंत असून ती काय काय करामती करत आहे हे नुकतेच अर्जुनला कळले आहे. अर्जुन आता सगळ्या गोष्टींचा बदला घेणार आहे. मालिकेचे कथानक संपत आल्यामुळे आता ही मालिका संपणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेत जेनिफरसोबतच कुशाल टंडन प्रमुख भूमिकेत आहे. Also Read : लहानपणी अशी दिसायची अभिनेत्री जेनिफर विंगेट