Join us
Daily Top 2Weekly Top 5

एरिका फर्नांडिस बनली पूजा बॅनर्जीची मेक-अप गुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:00 IST

एरिका ही केवळ एक लोकप्रिय अभिनेत्रीच आहे असे नव्हे, तर ती सौंदर्यविषयक विषयांवर ब्लॉगही लिहीत असते आणि ती एक चित्रकारही आहे.

आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्याने अभिनेत्री एरिका फर्नांडिसने रसिकांची अल्पावधीतच मनं जिंकली आहेत. एरिका ही केवळ एक लोकप्रिय अभिनेत्रीच आहे, असे नव्हे, तर ती सौंदर्यविषयक विषयांवर ब्लॉगही लिहीत असते आणि ती एक चित्रकारही आहे. इतकचे नाही तर आता ती पूजा बॅनर्जीची मेक-अप गुरूही बनली आहे.‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेत प्रेरणा शर्माच्या भूमिकेमुळे लोकप्रिय बनलेल्या एरिकाचा सोशल मीडियावर स्वत:चा फार मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या रंगभूषेत बदल करून स्वत:च्या सौंदर्याची विषयी ती लिहित असलेल्या ब्लॉग्जना मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत ती स्वत:ची रंगभूषा स्वत:च करीत असते, हे उघड गुपित असून आता आपल्या या रंगभूषेच्या कौशल्याचा आविष्कार करण्यासाठी तिला आणखी एक शिष्या मिळाली आहे. ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे  निवेदिता बसूची भूमिका साकारणारी पूजा बॅनर्जी.  यासंदर्भात पूजा बॅनर्जी म्हणाली, “एरिकाचं रंगभूषेवरील प्रभुत्व असामान्य आहे. ती किती वेगवेगळ्या गोष्टी करू शकते, ते पाहून मी थक्क झाले आहे. या मालिकेसाठी चित्रीकरणाला प्रारंभ झाल्यापासून मी तिला स्वत:ची रंगभूषा करताना पाहात आहे. तिच्या मेक-अपमुळे तिचं सौंदर्य किती खुलून दिसतं. त्यामुळेच जेव्हा तिने मला विचारलं की ती माझी रंगभूषा करू शकेल का, तेव्हा मी तिला आनंदाने होकार दिला. तिच्या मेक-अपचा परिणाम पाहून मी खरंच थक्क झाले. कारण तो माझ्या एकंदर व्यक्तिमत्त्वाला आणि कपड्यांना इतका शोभून दिसत होता की शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. तिची रंगभूषा पाहिल्यावर मला तिच्याकडून रंगभूषेच्या काही क्ऌप्त्या शिकून घेण्याची इच्छा झाली. मी तिला तसं विचारल्यावर आता रोज रंगभूषेला प्रारंभ करण्यापूर्वी ती मला रंगभूषेविषयी काही माहिती देत असते.”पडद्यामागील या दोन अभिनेत्रींची मैत्री ही इतरांसाठी एक आदर्श उदाहरण ठरावे. छोट्या पडद्यावर या दोन्ही अभिनेत्री  ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेतील भूमिकेमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2