Join us

एरिका फर्नांडिस कोणाला करतेय डेट ? सोशल मीडियावर व्यक्त केलं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 14:23 IST

ऑनस्क्रीन एरिका खूप सोज्वळ दिसत असली तरी रिअल लाईफमध्ये एरिका अधिक बोल्ड आणि बिनधास्त आहे.

एरिका फर्नांडिस कसौटी जिंदगी की या मालिकेमुळे 'संस्कारी बहू' अशी तिची इमेज बनत चालली आहे. मालिकेत ती प्रेरणा ही भूमिका साकारत आहे. ऑनस्क्रीन एरिका खूप सोज्वळ दिसत असली तरी रिअल लाईफमध्ये एरिका अधिक बोल्ड आणि बिनधास्त आहे.

सध्या एरिका तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे. एरिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने आपल्या बॉयफ्रेंडचा हात पकडला आहे. मात्र त्याचा चेहरा दाखवलेला नाही. हा फोटो शेअर करताना तिने कोणाला टॅग ही नाही केले. त्यामुळे एरिकाचा बॉयफ्रेंड कोण हे कळू शकलेले नाही. या फोटोसोबत एरिकाने एक कॅप्शनसुद्धा लिहिले आहे, मला तुझासोबत नेहमीच सुरक्षित वाटते. तुझ्याशी बोलणं सोप्प आहे आणि तू माझं ऐकतोस. तुझ्यासोबत मी खूप आनंदी आहे. अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

  सध्या एरिका ‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारतेय. सध्या ही मालिका आणि यातील प्रेरणाची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. यापूर्वी एरिका ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत झळकली होती.

टॅग्स :एरिका फर्नांडिसकसौटी जिंदगी की 2