Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिना खाननंतर आता ही अभिनेत्रीदेखील 'कसौटी जिंदगी की २'ला करणार रामराम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 17:19 IST

अभिनेत्री हिना खानने नुकताच 'कसौटी जिंदगी की २' मालिकेला रामराम केला असून आता आणखीन एक अभिनेत्री ही मालिका सोडण्याच्या वाटेवर आहे.

एकता कपूरचा लोकप्रिय मालिका कसौटी जिंदगी की २ मालिकेबाबत नवीन वृत्त समजले आहे. हे वृत्त आहे या मालिकेत मुख्य भूमिका असलेली प्रेरणाबाबत. प्रेरणाची भूमिका साकारणारी अभिनेत्री एरिका फर्नांडिस लवकरच मालिका सोडणार असल्याचे समजते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तिने अचानक हा निर्णय घेतला आहे. या मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिना खानने नुकतीच मालिका सोडली आहे.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मालिकेचे लेखक एरिका फर्नांडिसने शो सोडला हे योग्य आहे हे कसे ठरविले जाईल, यावर काम सुरू आहे. एरिकाला रिप्लेस केले जाणार की नाही, हे लेखकाला जाणून घ्यायचे आहे. याबाबत एरिकाला विचारले असता तिने यावर बोलणे टाळले. 

एकता कपूरची ही मालिका सप्टेंबर, २०१८मध्ये सुरू झाली. या मालिकेला प्रेक्षकांची खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रेक्षकांना प्रेरणा व अनुरागची केमिस्ट्री खूप भावते आहे. त्यात आता एरिका शो सोडते आहे, हे ऐकल्यावर प्रेक्षकांना धक्का बसला आहे.

काही दिवसांपूर्वी आपल्या शेवटच्या एपिसोडवेळी १२ मे रोजी हिना खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह करून चाहत्यांना सांगितले होते की, कसौटी जिंदगीच्या सेटवर आज तिचा शेवटचा दिवस आहे. या लाईव्हवेळी हिना खूप भावूक झाली होती आणि ती सर्वांना मिस करेल, असे सांगितले होते.

एरिका फर्नांडिस मालिका सोडणार की नाही, हे येत्या काही दिवसात समजेल.

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2स्टार प्लसहिना खानएरिका फर्नांडिस