'बहू हमारी रजनी कांत'मध्ये याची होणार एंट्री !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 10:45 IST
'बहू हमारी रजनी कांत' या मालिकेत लवकरच अभिनेता इजाज खानची एंट्री होण्याची शक्यता आहे. या मालिकेत अभिनेता करण व्ही. ...
'बहू हमारी रजनी कांत'मध्ये याची होणार एंट्री !
'बहू हमारी रजनी कांत' या मालिकेत लवकरच अभिनेता इजाज खानची एंट्री होण्याची शक्यता आहे. या मालिकेत अभिनेता करण व्ही. ग्रोव्हर साकारत असलेल्या भूमिकेसाठी इजाजला विचारणा करण्यात आलीय. करण या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याने त्याच्या भूमिकेसाठी इजाजसह मोहित मलिक, मोहित सेहगल, राकेश बापट यांच्या नावांचाही विचार करण्यात आला. मात्र शानच्या भूमिकेसाठी आता इजाजच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय. कहीं तो होगा, काव्यांजली, लौट आओ त्रिशा या मालिकेत इजाजच्या अभिनयाची झलक पाहायला मिळालीय. 'बहू हमारी रजनी कांत' या मालिकेतील एंट्रीबाबत बोलण्यास इजाजनं नकार दिलाय.