Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मर्द का नया स्वरूप'मध्ये 'या' अभिनेत्रीची होणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 06:30 IST

कलर्सच्या रूप...मर्द का नया स्वरूपच्या प्रेक्षकांसाठी हा आठवडा अतिशय आनंदाचा ठरला आहे. मर्दपणा साकारणाऱ्या या 'शो'मध्ये आता एका नव्या रूपात प्रेम उमलणार आहे

ठळक मुद्देरूप आणि ईशिकामध्ये केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे

कलर्सच्या रूप...मर्द का नया स्वरूपच्या प्रेक्षकांसाठी हा आठवडा अतिशय आनंदाचा ठरला आहे. मर्दपणा साकारणाऱ्या या 'शो'मध्ये आता एका नव्या रूपात प्रेम उमलणार आहे. रूप (शशांक व्यास) आणि ईशिका (दोनल बिश्त) कॉलेजच्या जाणार आहेत आणि त्यांचे कडू-गोड नाते एक नवीन कलाटणी घेण्याच्या मार्गावर आहे. एका कोझी बोनफायर पार्टी मध्ये टेलिव्हिजन हॉटी संजिदा शेख विशेष प्रवेशात दिसणार आहे. तिच्या परफॉर्मन्स विषयी बोलताना, संजिदा म्हणाली, '''मला रूप, ईशिका आणि इतर विद्यार्थ्यांना भेटून मजा आली, आम्ही बोनफायर पार्टीच्या चित्रीकरणाच्या वेळी खूप मजा केली. कमली गाण्यावर डान्स केलेला मला आवडला आणि अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि रोमांचित करणाऱ्या कथेत सहभागी होण्याचा मला आनंद झाला आहे.”

प्रेक्षकांना सुध्दा रूप आणि ईशिकामध्ये केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. जेव्हा सूडाने पेटलेली पलक ईशिकाला समुद्रात ढकलते तेव्हा काहीतरी वेगळे होते. जेव्हा रूप वळतो आणि त्याला हे दृश्य दिसते तेव्हा तो लगेच तिला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतो. रूप आणि ईशिका पाण्याच्या प्रवाहाचा सामना करू शकले नाहीत आणि ते समुद्राच्या जोरदार करंट कडे ओढले गेले. ते दोघे एका वेगळ्या बेटावर जाऊन पोहोचतात आणि बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असताना त्यांना तेथे देखणी हिना खान भेटते आणि ती त्यांना बाहेर पडण्यात मदत करते. ती त्याला ईशिका विषयीच्या भावना तिच्याशी बोलण्यासाठी सुध्दा प्रेरित करते आणि त्यासाठी त्याला काही युक्त्या सांगते.

टॅग्स :हिना खान