Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिकी पटेल हा बालकलाकार करणार या मालिकेत एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 17:14 IST

‘मासूम’ ही नवी सूडकथा सादर करणार आहे. या मालिकेचे मुख्य वैशिष्ट्य़ म्हणजे यात प्रमुख भूमिका साकारणारा बालकलाकार रिकी पटेल. ...

‘मासूम’ ही नवी सूडकथा सादर करणार आहे. या मालिकेचे मुख्य वैशिष्ट्य़ म्हणजे यात प्रमुख भूमिका साकारणारा बालकलाकार रिकी पटेल. भारतीय टीव्हीवर आजवर कधीच न दिलेल्या एका आगळ्य़ा भूमिकेत तो दिसेल. याशिवाय त्याची भूमिका असलेले ‘ट्य़ूबलाईट’ आणि ‘मेरी प्यारी बिंदू’ हे दोन चित्रपटही यंदाच प्रदर्शित होत असून ‘मासूम’ ही मालिकाही याच वर्षी प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे रिकी हा यंदाचा सर्वाधिक प्रेक्षणीय कलाकार ठरणार आहे! टीव्हीवरील मालिकांमध्ये आजवर बाल कलाकारांनी लहान मुलांच्याच भूमिका पार पाडल्या आहेत. परंतु मासूमची कथा अगदीच वेगळी असल्याने त्यात रिकीची भूमिकाही इतरांपेक्षा वेगळी असेल.या मालिकेत रिकी पटेलने आठ वर्षांच्या क्रिशची भूमिका साकारली असून तो आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असतो. छोट्या पडद्यावर एरवी दिसणा-या सासू-सुनेच्या राजकारणाच्या कथानकापेक्षा मासूमची कथा अगदीच वेगळी आहे. ही एका आठ वर्षाच्या मुलाची कथा असली, तरी हा मुलगा सामान्य आठ वर्षांच्या मुलासारखा अजिबात नाही.त्याच्या या भूमिकेबद्दल रिकी पटेलला विचारले असता त्याने सांगितले,‘मासूम’ या आगामी मालिकेद्वारे मी पुन्हा टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारणार आहे.टीव्ही मालिकेत इतकी आव्हानात्मक भूमिका मला साकारायला मिळाल्यामुळे खूप चांगले वाटत असून या भूमिकेतून मला खूप शिकायला मिळणार आहे. मी आतापर्यंत ब-याच चित्रपटांमध्ये भूमिका साकराल्या असून एखाद्या टीव्ही मालिकेत पूर्ण लांबीची ही माझी पहिलीच भूमिका असेल.”केवळ आठ वर्षांचा असलेल्या रिकीने आतापर्यंत हिंदी चित्रपटांतील अनेक दिग्गज कलाकारांबरोबर भूमिका रंगविल्या आहेत. त्याने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘टीन’ चित्रपटात, सलमान खानबरोबर ‘'ट्यूबलाईट सिनेमा’मध्ये तसेच शाहरूख खान, अक्षयकुमार व विद्या बालन यांच्याबरोबरही भूमिका साकारल्या आहेत.