Join us

'देवमाणूस' मालिकेत आता होणार या नव्या अभिनेत्रीची एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 14:10 IST

देवमाणूस मालिका आता नव्या वळणावर आलेली पाहायला मिळते आहे.

देवमाणूस मालिका आता नव्या वळणावर आलेली पाहायला मिळते आहे. चंदा डॉक्टरकडून तिचे पैसे घ्यायला सुरू आजीच्या वाड्यात राहायला लागली आहे. यामुळे तिला डॉक्टवर पाळत ठेवता येते. डॉक्टरकडे वारंवार ती पैश्याची मागणी करते तो पैसे द्यायला उशीर करतो म्हणून चंदा त्याची चांगलीच पिळवणूक करताना पाहायला मिळते. देवमाणूस मालिका निरोप घेण्याच्या उंबरठयावर असल्याची चर्चा आहे पण आता मालिकेत एका नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

देवमाणूस मालिकेतील नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागाता आता नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. ती डॉक्टरकडे चेकपसाठी आली आहे. डॉक्टरचा व्हिडीओ टीव्हीवर पाहून ती इथवर आल्याचे तिने सांगितलेले आहे .पण ही नवी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. ही अभिनेत्री आहे संजना काळे. 

संजना ही उत्तम अभिनेत्रीसोबत डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. संजना काळे हिने कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं, फक्त मराठी वरील सप्तपदी या मालिकेत काम केले आहे. याशिवाय तिने गेट टू गेदर या चित्रपटातही महत्वाची भूमिका बजावली आहे. 

देवमाणूस मालिका इतक्यात संपणार नसल्याचे अभिनेता किरण गायकवाड याने नुकतेच लाईव्ह येऊन सांगितले होते. आता या अभिनेत्रींच्या येण्याने मालिकेत नवा ट्विस्ट निर्माण होणार हे नक्की.