Join us
Daily Top 2Weekly Top 5

“तुमच्यासाठी काय पन”च्या मंचावर अंकुशची हटके अंदाजात एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 09:37 IST

कलर्स मराठीवरील “तुमच्यासाठी काय पन” या कार्यक्रमाच्या गाजावाजा जंक्शनवर दर आठवड्यामध्ये वेगवेगळे कलाकार हजेरी लावतात. यावेळेस मराठी सिनेसृष्टीतला आणि ...

कलर्स मराठीवरील “तुमच्यासाठी काय पन” या कार्यक्रमाच्या गाजावाजा जंक्शनवर दर आठवड्यामध्ये वेगवेगळे कलाकार हजेरी लावतात. यावेळेस मराठी सिनेसृष्टीतला आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलेला अभिनेता या मंचावर आला आणि जेंव्हा तो आला तेंव्हा त्याने सगळ्यांचीचं मने जिंकली. या आठवड्यामध्ये “तुमच्यासाठी काय पन”च्या मंचावर अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी आणि अमित राज यांनी हजेरी लावली. अंकुशची मंचावर एक नाही तर तीनवेळा धम्माकेदार एन्ट्री झाली. एकदा अंकुश हार्नेसने मंचावर आला तर एकदा चक्क काच तोडून, त्यामुळे तुमच्यासाठी काय पन या अतरंगी शोप्रमाणे आणि त्याच्या देवा या अतरंगी चित्रपटाप्रमाणे अंकुशची एन्ट्री देखील अतरंगी तसेच धमाकेदार झाली असं म्हणायला हरकत नाही. तुमच्यासाठी काय पनचा हा खास भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  कार्यक्रमामध्ये जर एन्ट्रीच इतकी भारी झाली असेल तर या सगळ्यांनी मिळून किती मज्जा – मस्ती केली असेल हे तुम्हाला कळलचं असेल. तेजस्विनी आणि स्पृहा यांनी रॅम्प वॉक केले. कार्यक्रमामधील विनोदवीरांनी काही धम्माकेदार स्कीट या कलाकारांसमोर समोर सादर केले. किशोर चौघुले, समीर चौघुले, अरुण कदम आणि विशाखा सुभेदार यांनी मिळून एक धम्माल स्कीट सादर केले ज्यामध्ये राजकारणातील काही दिग्गज अंकुश, तेजस्विनी आणि स्पृहा यांना त्यांच्या आगामी येणाऱ्या सिनेमासाठी साईन करायला येतात पण शेवटी रजनीकांत या त्रिकुटला साईन करण्यात यशस्वी ठरतात. तसेच विरुष्काच्या लग्नासंबंधीत देखील स्कीट धम्माल विनोदी स्कीट सादर केले.  शेवटी अंकुशला एक झकास सरप्राईज मिळाले जेंव्हा जिंतेद्र जोशीने मंचावर हजेरी लावली. त्याने अंकुशबद्दल बऱ्याच गंमतीदार आणि त्यांच्या मैत्रीबद्दल गोष्टीदेखील सांगितल्या. या वेळेसची फॅन मुमेंट जरा जबरदस्त होती कारण मंचावर होता अंकुश चौधरी. गडचिरोलीहून आलेल्या एका फॅनने त्याच्यासोबत डान्स करण्याची इच्छा व्यक्त करताच अंकुशने एक सेंकददेखील वेळ न दवडता तिच्यासोबत डान्स केला.