Join us

'बुआ'ची द कपिल शर्मा शोमध्ये एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 15:02 IST

कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा शो बंद झाल्यानंतर अभिनेत्री उपासना सिंगनं कपिलची साथ सोडली होती.रसिकांची लाडकी बुआ कपिलच्या नव्या ...

कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा शो बंद झाल्यानंतर अभिनेत्री उपासना सिंगनं कपिलची साथ सोडली होती.रसिकांची लाडकी बुआ कपिलच्या नव्या शोऐवजी कृष्णाच्या कॉमेडी नाईट लाइव्ह या शोमध्ये काम करत होती. मात्र काही दिवसांपूर्वी उपासना सिंग यांचं कॉमेडी नाईट लाइव्ह या शोच्या टीमसह बिनसलं.यानंतर उपासना सिंग यांनी या शोमधून एक्झिट घेतली. आता त्या लवकरच कपिलच्या द कपिल शर्मा शोमध्ये एंट्री मारणार आहेत.आता उपासना त्यांच्या प्रसिद्ध बुआच्या अंदाजात रसिकांच्या भेटीला येतात की अन्य वेगळ्या कोणत्या अंदाजात हे मात्र गुलदस्त्यातच आहे.