Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत झाली या अभिनेत्रीची एन्ट्री, पहा कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 07:00 IST

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत आता नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिमन्यू लतिकाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आणि आपला तुटलेला संसार पुन्हा जोडण्यासाठी बापूच्या घरी जातो. तिथे गेल्यावर मात्र बापूचा राग अनावर होतो आणि अभिमन्यूला ते घरातून बाहेर काढतात. अभिमन्यू बापूला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो लतिका माहेरी आणि सासरी दोन्ही घरी सुखी राहील असे आश्वासनही देतो. पण, अभिमन्यूच्या वागणुकीमुळे बापू त्याच्यावर विश्वास ठेवण्यास असमर्थ ठरतात. तर तिकडे अभिमन्यूचे वडील त्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अभिमन्यू आपला मुलगा आहे आणि त्याला जे पाहिजे ते मिळवून देण्याची इच्छा ते व्यक्त करतात.

अभिमन्यूचे आई वडील दोघेही लतिका आणि अभिमन्यू पुन्हा एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त करतात. मालिकेत घडणाऱ्या या घडामोडीत आता नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. हे पात्र म्हणजे नंदिनी. हे पात्र नेमके कोण साकारणार? आणि ही नंदिनी नक्की आहे तरी कोण? याबाबत उत्सुकता निर्माण होते.

नंदिनीची भूमिका अभिनेत्री अदिती द्रविड साकारणार आहे. अदितीने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाची मैत्रीण म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती. त्यानंतर अदिती आणि रसिका सुनील या दोघींची चांगली मैत्री झाली होती.

अदिती आणि रसिका यु अँड मी या व्हिडीओ अल्बममध्ये झळकले होते. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. अदिती अभिनेत्रीसोबतच गीतकार देखील आहे. तिने लिहिलेले गाणे ‘झिलमिल’ प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर -महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेत तिने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची थोरली बहीण तुळसाची भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.

अदिती आता कलर्स मराठी वाहिणीवरच्या सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेत आहे. तिची ही भूमिका विरोधी असणार की आणखी काही हे येत्या काही भागातच स्पष्ट होईल. 

टॅग्स :अदिती द्रविडकलर्स मराठी