अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी ‘काळभैरव रहस्य’मालिकेतील या अभिनेत्री गाण्याच्या रिअॅलिटी कार्यक्रमासाठी दिली होती ऑडिशन?ओळख कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 16:14 IST
‘काळभैरव रहस्य’ या सामाजिक थरारक मालिकेतील आपल्या नम्रताच्या भूमिकेने प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळविलेल्या छावी पांडे या रूपसुंदर अभिनेत्रीची एक ...
अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी ‘काळभैरव रहस्य’मालिकेतील या अभिनेत्री गाण्याच्या रिअॅलिटी कार्यक्रमासाठी दिली होती ऑडिशन?ओळख कोण आहे ती?
‘काळभैरव रहस्य’ या सामाजिक थरारक मालिकेतील आपल्या नम्रताच्या भूमिकेने प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळविलेल्या छावी पांडे या रूपसुंदर अभिनेत्रीची एक गोष्ट फारशी कुणाला ठाऊक नसेल.अतिशय मेहनती कलाकार असलेली छावी पांडे ही एक उत्तम गायिकाही आहे. तिने गाण्याचे शास्त्रोक्त शिक्षणही घेतले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात उतरण्यापूर्वी तिने काही गाण्यांच्या रिअॅलिटी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑडिशन्सही दिल्या होत्या. या संदर्भात तिच्याशी चर्चा केल्यावर तिने सांगितले, “मला गायिका व्हायचं होतं आणि म्हणूनच मी काही गाण्यांच्या रिअॅलिटी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑडिशन्सही दिल्या होत्या. पण आज मी जिथे आहे, त्याबद्दल मी खुश आहे. गायिका होण्यापेक्षा अभिनयाने मला अधिक लोकप्रिय बनविलं आहे. पण माझी गाण्याची आवड आजही कायम आहे. त्यामुळे मला जेव्हा केव्हा फावला वेळ मिळतो, तेव्हा मी बैठक मारते आणि रियाज करते. गाण्यामुळे मला मानसिक आनंद मिळतो.” छावी हसून म्हणाली, “मी नातेवाईकांमध्ये असले की ते मला नेहमी गाणं म्हणण्याची फर्माईश करतात.” पारंपरिक चाकरीच्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग अवलंबिणा-या सर्वांनी आपल्या कामावर श्रध्दा ठेवून पुढे जात राहिले पाहिजे आणि छोट्या-मोठ्या अपयशांनी खचून न जाता आपले प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजेत, असे ती तरुणांना सांगते. ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेत विनोदी पध्दतीने केले आहे. आपल्या अतिआग्रही स्वभावामुळे सासूला कसे अनेक त्रास सोसावे लागतात, हे दर्शविणारी ही मालिका आहे. कधी कधी गरजेपेक्षा अधिक गोष्टींची मागणी ही संकटांना निमंत्रण देते, हे या मालिकेत हलक्याफुलक्या पध्दतीने दाखविले आहे. आपली सून अगदी परिपूर्ण आणि निर्दोष असावी, याची हाव धरणे अयोग्य असून आपल्या सुनांकडून सासवांनी अवाजवी अपेक्षा करू नयेत, असा संदेश ही मालिका देते.या मालिकेत एक आई आपल्या मुलाला सर्वगुणसंपन्न पत्नी मिळावी यासाठी देवाकडे नवस करते. पण एका मुलीत सगळेच गुण नसल्याने देवाच्या आशीर्वादामुळे तिच्या मुलाचे लग्न पाच मुलींशी होते आणि तिथून सुरू होते या मालिकेत खरी धमाल-मस्ती सुरू झाली होती.