Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मुलगी झाली हो’ मालिकेत भावनिक वळण, विलास करणार माऊचा मुलगी म्हणून स्वीकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 17:18 IST

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मध्ये अत्यंत भावनिक वळण पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मध्ये अत्यंत भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. जिने या जगात पाऊल ठेवण्या आधीपासून फक्त आणि फक्त तिरस्कार सहन केला त्या माऊला आता मुलगी म्हणून घरात हक्काचं स्थान मिळणार आहे. खरतर दुसरीही मुलगी झाली म्हणून माऊला मुलगी म्हणून तिच्या वडिलांनी कधी स्वीकारलं नाही इतकंच काय तिचं तोंडही पाहिलं नाही. तिला लहानपणापासून हीन वागणूक मिळाली. गाईगुरांच्या गोठ्यात ती लहानाची मोठी झाली. वंशाला दिवा हवा या हट्टासापायी माऊच्या वडिलांनी आणि आजीने तिला घरापासून लांब ठेवलं. पण पोटच्या मुलाने जेव्हा दगा दिला तेव्हा विलासच्या मागे सावलीसारखी उभी राहिली ती माऊ.

 

माऊच्या या त्यागाची खरी किंमत आता विलासला कळली आहे. म्हणूनच सन्मानाने या लेकीला तो तिच्या हक्काच्या घरी आणणार आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील हे वळण नव्या बदलाची नांदी आहे. आजही बऱ्याच ठिकाणी मुलीचा जन्म म्हणजे अपराध मानला जातो. या मानसिकतेला विचार करायला भाग पडणारं मालिकेतील हे वळण असेल. लक्ष्मीच्या पावलांनी माऊचा गृहप्रवेश होणार आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह