Join us

'बिग बॉस' फेम एल्विश यादवने हॉटेलमधील चाहत्याच्या कानाखाली मारली अन्...; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 09:45 IST

बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादवच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय (Elvish Yadav)

बिग बॉस ओटीटी 2 चा (Bigg Boss OTT) विजेता एल्विश यादव सतत चर्चेत असतो. कधी सापाची तस्करी केल्याच्या आरोपाखाली एल्विश वाद ओढवून घेतो. तर कधी देवाच्या दर्शनासाठी गेलेल्या एल्विशला लोकांकडून घेरलं जातं. एल्विश यादवचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. या व्हिडीओत एल्विशने (Elvish Yadav) पुन्हा एकदा राडा केलेला दिसून येतोय. जयपूरच्या (Jaipur) हॉटेलमध्ये गेलेल्या एल्विशने एका माणसाला कानाखाली मारल्याची घटना घडलीय. 

झालं असं की... एल्विश जयपूरच्या एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तिथे एल्विशचे एका माणसासोबत जोरदार वाद झाले. या वाद इतका टोकाला गेला की, एल्विशने त्या व्यक्तीच्या कानाखाली जोरदार लगावली. एल्विशच्या मित्रांनी त्याला सावरलं आणि मागे घेतलं. या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होताच एल्विशने त्याची प्रतिक्रिया दिलीय. तो म्हणाला,  "मुद्दा असा आहे की मला भांडण करण्यात कसलीही हौस नाही. मला कोणाला मारण्यातही काडीमात्र रस नाही.  मी माझ्या कामाशी काम ठेवतो." 

एल्विश पुढे म्हणाला, "मला वाटतं की सर्व नॉर्मल असावं. ज्यांना माझ्यासोबत फोटो काढायचे असतील त्यांनी आरामात काढावा फोटो. पण जे मागून कमेंट पास करतात त्यांना मी सोडणार नाही. माझ्यासोबत त्यावेळी पोलिस आणि कमांडो होते. मला वाटत नाही की, मी काही चुकीचं केलंय. तो माणूस माझ्यावर वैयक्तिक टीका करत होता. त्यामुळे मी त्याच्या कानाखाली मारली. आणि या गोष्टीचा मला अजिबात पश्चाताप नाही. माझा स्वभाव असाच आहे." हे प्रकरण झाल्याने एल्विशचं काही लोक समर्थन करत असून काहीजण त्याच्यावर टीका करत आहेत. 

टॅग्स :बिग बॉसजयपूर