Elvish Yadav Backs Malti Chahar In Bigg Boss 19: सलमान खान होस्ट करत असलेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' आता आपल्या अंतिम टप्प्यात आला आहे. तान्या मित्तल, गौरव खन्ना, अशनूर कौर, प्रणीत मोरे, कुनिका सदानंद, अमाल मलिक, शाहबाज बदेशा, मालती चहर आणि फरहाना भट हे ९ तगडे स्पर्धक ट्रॉफीसाठी जोरदार स्पर्धा करत आहेत. अशातच 'बिग बॉस ओटीटी २'चा विजेता आणि प्रचंड मोठा चाहता वर्ग असलेला एल्विश यादवने 'बिग बॉस १९' मधील आपला आवडता स्पर्धक जाहीर केला आहे.
सध्या सोशल मीडियावर सगळेच प्रणित मोरे आणि गौरव खन्नाच्या गेमचे कौतुक करत त्यांच्यापैकी एकाला विजेता मानत आहेत. पण एल्विश यादवने मात्र त्यांना पाठिंबा दिला नाही. एल्विश यादवने थेट मालती चहर हिच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. एल्विश यादवने मालती चहरचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत फक्त "मतदान करा" (Vote Karein) असे लिहिले आहे.
एल्विश यादवची पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला. चाहत्यांनी आश्चर्य आणि उत्साह व्यक्त करत अनेक प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, "एल्विश भाईने खेळ पलटवला". दुसऱ्या एका युजरने म्हटले, "एक मजबूत वाईल्ड कार्ड स्पर्धक दुसऱ्या मजबूत वाईल्ड कार्ड स्पर्धकाला पाठिंबा देत आहे. आता मजा येईल". एल्विश यादवच्या या खास पाठिंब्यानंतर 'बिग बॉस १९' च्या ट्रॉफीसाठीची ही स्पर्धा आणखी चुरशीची होणार यात शंका नाही.
घरात 'फॅमिली वीक'ची धूमसध्या 'फॅमिली वीक' सुरू असल्यामुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण भावनिक झाले आहे. अनेक स्पर्धकांच्या कुटुंबियांनी घरात प्रवेश केला आहे. आतापर्यंत कुनिका सदानंदचा मुलगा, अशनूर कौरचे वडील, गौरव खन्नाची पत्नी, फरहान भटची आई, प्रणित मोरेचा भाऊ आणि अमल मलिकचा भाऊ घरात येऊन गेले आहेत. आता लवकरच तान्या मित्तलचा भाऊ, शाहबाज बदेशाचे वडील आणि मालती चहरचा भाऊ देखील घरात प्रवेश करणार आहे.
क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण
मालती चहर ही भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण आहे. ती एक अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका आहे. नुकतंच तिचा भाऊ दीपक चहरही 'फॅमिली वीक' दरम्यान तिच्या भेटीसाठी शोमध्ये आला. मालती २०१४ च्या फेमिना मिस इंडियामध्ये अंतिम फेरीत पोहोचली होती आणि 'फेमिना मिस इंडिया दिल्ली २०१४'मध्ये तिने 'मिस फोटोजेनिक' हा किताबही जिंकला. २०१८ साली आलेल्या मध्ये अनिल शर्मा दिग्दर्शित 'जिनिअस' या बॉलिवूड सिनेमातून तिने डेब्यू केला होता. २०२२मध्ये तिने अरविंद पांडे दिग्दर्शित 'इश्क पश्मीना' या रोमँटिक सिनेमात काम केले होते. मालतीने अभिनयाव्यतिरिक्त लघुपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.
Web Summary : Elvish Yadav, Bigg Boss OTT 2 winner, supports Malti Chahar in Bigg Boss 19, urging fans to vote. This endorsement intensifies the competition. Currently, the show features a 'Family Week' with relatives entering the house, creating emotional moments.
Web Summary : बिग बॉस ओटीटी 2 के विजेता एल्विश यादव ने बिग बॉस 19 में मालती चाहर का समर्थन किया और प्रशंसकों से वोट करने का आग्रह किया। इस समर्थन से प्रतिस्पर्धा तेज हो गई है। वर्तमान में, शो में 'फैमिली वीक' चल रहा है।