एल्विश यादव आणि जिया शंकर होस्ट करत असलेला 'एंगेज २' हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शोमधील बोल्ड टास्क पाहून प्रेक्षकांचा पारा चढला आहे. या शोमध्ये स्पर्धकांना दिले जाणारे टास्क इतके बोल्ड आहेत की ते पाहून हा शो बंद करण्याची मागणीही होत आहे.
'एंगेज २' हा एक रिएलिटी शो आहे. या शोमध्ये स्पर्धकांना कपल बोल्ड टास्क दिले जातात. त्यातील काही टास्कचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. एका टास्कमध्ये पुरुष स्पर्धकाला महिला स्पर्धकाचे कपडे हात न लावता तोंडाने काढण्यास सांगितलं होतं. स्पर्धकानेही आपल्या पार्टनरचे कपडे तोंडाने काढले. या शोमध्ये आणखी एक टास्क देण्यात आला होता. तो म्हणजे चिखलाने माखलेल्या महिलेला सर्वांसमोर अंघोळ घालायची होती.
शोमधील काही जोड्यांनी हा टास्कदेखील पूर्ण केला. ऑन कॅमेरा सगळ्यांसमोरच आपल्या महिलेला त्यांनी अंघोळ घातली. याशिवाय तोंडात आइसक्रीम ठेवून महिला पार्टनरच्या अंगावर फिरवायचा, असाही टास्क दिला गेला होता. हे अडल्ट टास्क बघून प्रेक्षकांचा पारा चढला आहे. यासारखेच इतर अनेक बोल्ड टास्कही या शोमध्ये कपलला दिले जातात. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत एल्विश यादव आणि जिया शंकरला ट्रोल केलं आहे. तर काहींनी हा शो बंद करण्याची मागणी केली आहे.
एल्विश यादवचा एंगेज २ हा शो ओटीटी शो आहे. जिओ हॉटस्टारवर व्हॅलेंटाइन डेपासून हा शो सुरू करण्यात आला आहे. पण, या शोमध्ये देण्यात आलेले टास्कपासून ओटीटीवरील कंटेटवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Web Summary : Elvish Yadav's show 'Engage 2' faces backlash for its explicit tasks. Contestants removing clothes with their mouths and bathing partners publicly ignited controversy, leading to calls for the show's cancellation.
Web Summary : एल्विश यादव का शो 'एंगेज 2' अपने बोल्ड टास्क के कारण विवादों में है। प्रतियोगियों द्वारा मुंह से कपड़े निकालने और सार्वजनिक रूप से स्नान कराने जैसे कार्यों ने विवाद खड़ा कर दिया है, जिससे शो को रद्द करने की मांग हो रही है।