Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणा पनवार म्हणते, एलेनाची व्यक्तिरेखा आहे माझ्याशी खूप मिळतीजुळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 19:01 IST

‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’चा तिसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

प्रेक्षकांशी घट्ट भावनात्मक बंध निर्माण करत, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी मालिकेच्या नव्या सत्राने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. कथानाकातील जीवनाला हादरा देणारी नागमोडी वळणे आणि पुढे उभी ठाकलेली आव्हाने पाहता सोनाक्षी (एरिका फर्नांडिस) आणि देव (शहीर शेख) यांच्या जीवनात पुढे काय वाढून ठेवले आहे, हे काळच सांगू शकेल. या मालिकेच्या मागील सत्रातील कलाकार याही सत्रात पुन्हा काम करत आहेत. यापैकी एलेना बोस त्रिपाठी ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा पुन्हा एकदा साकारत आहे, प्रेरणा पनवार ही अभिनेत्री. तिसर्‍या सत्रात पुन्हा ही भूमिका करत असल्याचा रोमांच तिने व्यक्त केला आणि आपल्या अनुभवाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रेरणा पनवार म्हणते, “जेव्हा मी हे ऐकले की, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’चे निर्माते या मालिकेचे तिसरे सत्र घेऊन येत आहेत, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही, कारण त्यातील सर्व कलाकार म्हणजे माझे जणू कुटुंबच झाले आहे. अशा गुणी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच फार मौलिक असतो. ही मालिका म्हणजे माझ्या कारकीर्दीतील महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याबद्दल मी एलेना या व्यक्तिरेखेची सदैव ऋणी राहीन. या मालिकेच्या सेट्सवर- पडद्यावर आणि पडद्याच्या मागे मला खूप काही शिकायला मिळाले आहे.”

 आपण साकारत असलेल्या व्यक्तिरेखेबद्दल ती म्हणते, “एलेना ही व्यक्तिरेखा माझ्या अंतःकरणाच्या खूप जवळ आहे आणि ती अनेक प्रकारे माझ्यासारखीच आहे. ती बोलघेवडी, उत्साहाने सळसळणारी आहे तशीच मी ही आहे. या सत्रात मी एका आईची भूमिका करत आहे. माझ्यासाठी हा नवा अनुभव आहे. माझी व्यक्तिरेखा या मालिकेबरोबर मोठी आणि प्रगल्भ झाली आहे, तशीच मीही परिपक्व झाले आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी नेहमीच खूप खास असेल.”

 या मालिकेत आता एक रोचक वळण आले आहे, ज्यामुळे दीक्षित कुटुंब हादरून गेले आहे. देव आणि सोनाक्षी यांचे वैयक्तिक आयुष्य ढवळून निघाले आहे. त्यांच्यातील मतभेद कधी दूर होतील, हे काळच सांगू शकेल.

टॅग्स :सुप्रिया पिळगांवकरएरिका फर्नांडिस