Join us
Daily Top 2Weekly Top 5

​एकता कपूरने टेड टॉक्स इंडिया नई सोचमध्ये सांगितले तिच्या यशाचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 12:00 IST

एकता कपूरने बालाजी टेलिफ्लिम्स या बॅनर अंतर्गत एकाहून एक हिट मालिका दिल्या आहेत. तिने निर्माती म्हणून हम पाच या ...

एकता कपूरने बालाजी टेलिफ्लिम्स या बॅनर अंतर्गत एकाहून एक हिट मालिका दिल्या आहेत. तिने निर्माती म्हणून हम पाच या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. तिची पहिलीच मालिका प्रचंड हिट झाली होती. यानंतर तिने क्योंकी साँस भी कभी बहू थी, कसोटी जिंदगी की, कसम से, कहानी घर घर की यांसारख्या अनेक हिट मालिका दिल्या. या सगळ्या मालिकांच्या नावाचा विचार केला तर एक गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात येईल की तिच्या अनेक मालिकांच्या नावांची सुरुवात ही क या अक्षरापासूनच असते. कारण तिचा ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास आहे. तिने ही गोष्ट अनेक वेळा तिच्या मुलाखतींमध्ये देखील सांगितलेली आहे. ‘स्टार प्लस’वर ‘टेड टॉक्स इंडिया नई सोच’ हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध निर्माती एकता कपूरला पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात ती आजवर तिला मिळालेल्या यशाचे रहस्य प्रेक्षकांना सांगणार आहे. या कार्यक्रमात तिने सांगितले, मी नेहमीच माझ्या मालिकांमधून सामाजिक समस्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असते. विशेषत: महिलांवरील अन्याय आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या समस्यांवर मी माझ्या मालिकेद्वारे प्रकाशझोत टाकला आहे. टिव्ही हे माध्यम प्रचंड प्रभावी आहे. आज या छोट्या पडद्याने अनेक स्टार बॉलिवूडला दिले आहेत. शाहरुख खानसारखा बॉलिवूडचा सुपरस्टार देखील या छोट्या पडद्यामुळेच बॉलिवूडला मिळाला आहे. मी मालिकांप्रमाणे चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे. आजवर निर्मिती केलेल्या चित्रपटांपैकी मला डर्टी पिक्चर सगळ्यात जास्त आवडतो. एखाद्या वास्तव घटनेवर आधारित चित्रपट निर्माण करण्याची संधी मिळाल्यास मी भविष्यात त्याचा नक्कीच विचार करेन. अशाप्रकारच्या चित्रपटांमुळे तुम्ही लोकांच्या दिर्घकाळ स्मरणात राहातात असे मला वाटते. एकता कपूरने ‘टेड टॉक्स इंडिया नई सोच’ या कार्यक्रमात तिच्या यशाचे गमक केवळ ५.४० मिनिटांत सांगितले. तिचे हे स्पीच उपस्थितांना खूपच आवडले. Also Read : ​एकता कपूरला सगळे काही म्हणा, पण ‘ना’ म्हणू नका!