Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिय स्मृती मावशी...; एकता कपूरच्या 3 वर्षीय चिमुकल्यानं स्मृती इराणींसाठी लिहिली खास नोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:14 IST

होय, एकता कपूरच्या  (Ekta Kapoor ) 3 वर्षांच्या लेकानं स्मृती इराणींसाठी ( Smriti Irani) खास नोट लिहिली. मग काय त्याचीच चर्चा रंगली.

 केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ( Smriti Irani) यांनी कालच (23 मार्च) आपला 46 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त स्मृती यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेकांनी त्यांना शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यात. यातली एक पोस्ट सर्वाधिक लक्षवेधी ठरली. होय, एकता कपूरच्या  (Ekta Kapoor ) 3 वर्षांच्या लेकानं स्मृती इराणींसाठी खास नोट लिहिली. मग काय त्याचीच चर्चा रंगली.  एकता कपूरनं तिच्या इन्स्ट्ग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत तिचा मुलगा रवी यानं मावशी स्मृती ईराणी यांच्यासाठी लिहिलेली खास नोट शेअर केली.

काय आहे या नोटमध्ये...

एकताचा मुलगा रवी या नोटमध्ये लिहितो,

प्रिय स्मृती मावशी,

मी तीन वर्षांचा आहे आणि  मी तुम्हाला फार कमी वेळा भेटलोय. पण माझ्या आईनं एक चांगली गोष्ट केली आहे. माझी आई मला नेहमी सांगते की, ती तुमच्याकडून खूप काही शिकलीये. जसं की ती बरेचदा काही गोष्टी वाचून दाखवते. मी माझ्या आसपासच्या लोकांना तुमच्याबद्दल बोलताना ऐकतो. ते म्हणतात की, तुम्ही खूप खूप खूप शक्तिशाली आहात. पण माझ्यासाठी तुम्ही माझ्या प्रेमळ मावशी आहात. मला माहीत  तुमचं माझ्यावर खूप प्रेम आणि तुम्ही माझी काळजी देखील करता. आज तुमचा वाढदिवस आहे.  तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, अशी मी प्रार्थना करतो. कदाचित तुम्ही त्या काही निवडक लोकांपैकी एक आहात ज्यांनी मला पाहिलं होतं आणि आशीर्वाद दिले होते. त्यातले काही आशीर्वाद मला तुम्हाला आज परत द्यायचे आहेत. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला माहीत आहे जेव्हा मी मोठा होईन तेव्हा मी महिलांचा आदर करेन. कारण तुमच्यासारखी स्त्री माझी मावशी आहे. आणि मला खात्री आहे मी जर कधी चुकलो तर तुम्ही मला ओरडाल आणि मला मार्गदर्शनही कराल. खुप सारं प्रेम, लवकरच भेटू. -तुमचा भाचा  रवी

स्मृती इराणींनी अशी दिली प्रतिक्रियाएकता कपूरच्या या पोस्टवर स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी रवीचं कौतुक केलं आहे. ‘माझ्या रवी बाळा, मी तुला कधीच ओरडणार नाही. तू सर्वांशी प्रेमानं आणि आदरानं वागशील याची मला खात्री आहे. तुझ्या शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद..., अशा शब्दांत त्यांनी चिमुकल्या रवीचे आभार मानले आहेत. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.स्मृती इराणी व एकता कपूर खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

टॅग्स :एकता कपूरस्मृती इराणी