एकता कपूर रणवीर सिंगला छोट्या पडद्यावर करणार लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 14:42 IST
एकता कपूरची कुमकुम भाग्य ही मालिका सध्या खूप गाजते आहे. या मालिकेतील अभी आणि प्रग्याची जोडी तर प्रेक्षकांना खूप ...
एकता कपूर रणवीर सिंगला छोट्या पडद्यावर करणार लाँच
एकता कपूरची कुमकुम भाग्य ही मालिका सध्या खूप गाजते आहे. या मालिकेतील अभी आणि प्रग्याची जोडी तर प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेची लोकप्रियता पाहाता एकताने याच मालिकेच्या कथानकाशी सार्धम्य असलेली कुंडली भाग्य ही मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. या मालिकेत प्रेक्षकांना प्रग्याच्या बहिणी प्रीती आणि सृष्टी यांची कथा पाहायला मिळणार आहे. कुमकुम भाग्य ही मालिका लवकरच 100 भाग पूर्ण करणार आहे. त्याच्या निमित्तानेच एकताने कुंडली भाग्य या मालिकेचा विचार केला. कुंडली हा शब्द आपल्या नियतीशी जोडलेला असल्याने या मालिकेच्या शीर्षकात तिने कुंडली या शब्दाचा विचार केला आहे. या मालिकेतील नायक एक क्रिकेटर असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकता ही क्रिकेट या खेळाची चाहती नाहीये. पण तरीही तिला हार्दिक पंड्या आवडतो. एकता आज छोट्या पडद्यावरची क्वीन मानली जाते. तिला छोट्या पडद्यावर कोणत्या अभिनेत्याला पाहायला आवडेल असे विचारले असता तिने रणवीर सिंगचे नाव घेतले. ती सांगते, रणवीर नेहमीच सगळ्यांचे मनोरंजन करत असल्याने तो मला खूप आवडतो. त्यामुळेे त्याला छोट्या पडद्यावर पाहायला आवडेल. त्याचसोबत अर्जुन कपूर आणि वरुण धवन यांनादेखील छोट्या पडद्यावर पाहायला आवडेल.बडे अच्छे लगते है या मालिकेत राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यावर एक बोल्ड दृश्य चित्रीत करण्यात आले होते. या दृश्याची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. लोकांना छोट्या पडद्यावर बोल्ड सीन पाहायला आवडत नाही असे एकताचे म्हणणे आहे. या दृश्यानंतर काही काळानंतर मालिकेचा टीआपरपी ढासळला असल्याचे तिचे म्हणणे आहे. पण तेच दृश्य इंटरनेटवर लाखो लोकांनी पाहिले असल्याचे देखील ती कबूल करते. छोट्या पडद्यावर लोकांना बोल्ड दृश्य पाहायला आवडत नसल्याने ती छोट्या पडद्यावर बोल्ड दृश्य दाखवणे टाळते असे ती सांगते. Also Read : Shocking : ‘या’ कारणाने एकता कपूरने अद्याप केले नाही लग्न!