Join us  

अभिनेता पार्थ समथान पाठोपाठ बालाजी टेलिफिल्म्सच्या आणखी एका सदस्याला कोरोना 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 11:52 AM

टीव्ही अभिनेता पार्थ समथान यांच्यानंतर आता एकता कपूरच्या टीमधील एका सदस्यालाही कोरोनाने ग्रासले आहे.

ठळक मुद्देबालाजी टेलिफिल्म्सच्या ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकेतील अभिनेता पार्थ समथान यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत आहेत. फिल्म इंडस्ट्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन, टीव्ही अभिनेता पार्थ समथान यांच्यानंतर आता एकता कपूरच्या टीमधील एका सदस्यालाही कोरोनाने ग्रासले आहे.एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सची एक्झिक्युटिव्ह व्हिपी तनुश्री दासगुप्ता कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. आधी तनुश्रीची आई कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. तिच्या आईला होम क्वारंटाईन करण्यात आले होते.

उपचारानंतर तिची आई ठीक झाली होती. याचदरम्यान तनुश्रीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. शनिवारी रात्री तिला रूग्णालयात हलवण्यात आले. येथे डॉक्टरांनी तिची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटीव्ह आली. सध्या तनुश्री रूग्णालयात उपचार घेत आहे.

ती म्हणाली, कोरोनामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर माझी योग्य ती काळजी घेत आहेत. रूग्णालयातील सुरुवातीचे काही दिवस दहशतीत गेले. पण आता मी ठीक आहे. मला ठीक व्हायला आणखी काही दिवस लागतील. पण मी लवकरात लवकर बरी होऊन माझ्या घरी जाऊ इच्छिते.

बालाजी टेलिफिल्म्सच्या ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकेतील अभिनेता पार्थ समथान यालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली. त्यामुळे त्याला रूग्णालयात भरती होण्याची गरज भासली नाही. सध्या तो घरीच आयसोलेशनमध्ये आहे. पार्थ कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर ‘कसौटी जिंदगी की 2’चे शूटींग काही दिवसांसाठी थांबवण्यात आले आहे.

टॅग्स :एकता कपूर