Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐजाज खानची ‘बिग बॉस 14’मधून शॉकिंग एक्झिट, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 12:21 IST

काल एक प्रोमो रिलीज झाला आणि ऐजाजच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. घरातील सदस्यही शॉक्ड झालेत. अर्शी खान आणि अली गोनी तर ढसाढसा रडले.

ठळक मुद्दे‘बिग बॉस 14’मध्ये ऐजाज खानने 106 दिवसांचा प्रवास पूर्ण केला. यादरम्यान घरातील सदस्यांसोबतची त्याची भांडणं, को-कंटेस्टंट पवित्रा पुनियासोबतचा त्याचा लव्ह अँगल यामुळे ऐजाज चर्चेत राहिला.

ऐजाज खान हा ‘बिग बॉस 14’च्या घरात एन्ट्री घेणारा पहिला सदस्य होता. बिग बॉसच्या घरात ऐजाज सर्वांवर भारी पडला. बिग बॉसच्या ट्रॉफीचा प्रबळ दावेदार म्हणून ऐजाजकडे पाहिले जात होते. पण काल एक प्रोमो रिलीज झाला आणि ऐजाजच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. घरातील सदस्यही शॉक्ड झालेत. अर्शी खान आणि अली गोनी तर ढसाढसा रडले. या प्रोमोत बिग बॉस खुद्द ऐजाज घराबाहेर पडत असल्याची घोषणा करत आहेत. आज हा एपिसोड प्रसारित होणार आहे. खरे तर ऐजाजने ना बिग बॉसचा कोणता नियम तोडला, ना कमी मतांमुळे वाद झाला. मग तो असा अचानक ‘बिग बॉस 14’मधून बाहेर का पडतोय? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. तर आता त्याचेही उत्तर मिळाले आहे.

होय, ऐजाज पर्सनल कारणांमुळे नाही तर आपल्या वर्क कमिटमेंटमुळे ‘बिग बॉस 14’मधून बाहेर पडणार आहे. रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी ऐजाजने एक शो साईन केला होता. बिग बॉसचा शो लांबला आणि ऐजाजमुळे या शोचे शूटींग रखडले. आपल्यामुळे शूटींग थांबावे, संपूर्ण टीमला प्रतीक्षा करावी लागावी, हे ऐजाजच्या मनाला न पटणारे होते. त्यामुळे त्याने स्वत: ‘बिग बॉस 14’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

‘बिग बॉस 14’मध्ये ऐजाज खानने 106 दिवसांचा प्रवास पूर्ण केला. यादरम्यान घरातील सदस्यांसोबतची त्याची भांडणं, को-कंटेस्टंट पवित्रा पुनियासोबतचा त्याचा लव्ह अँगल यामुळे ऐजाज चर्चेत राहिला. ऐजाज ‘बिग बॉस 14’च्या विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. ऐजाजच्या जागी ‘बिग बॉस 14’च्या घरात देवोलिना येणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस १४