Join us

​कुशल टंडन पडला अनेरी वजानीच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 11:48 IST

कुशल टंडन आता पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. कुशल प्रेमात पडण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. एलेना बोएवा या ...

कुशल टंडन आता पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. कुशल प्रेमात पडण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. एलेना बोएवा या त्याच्या प्रेयसीसोबत तो नच बलियेमध्ये झळकला होता. त्यानंतर तो बिग बॉसच्या घरात गौहर खानच्या प्रेमात पडला. गौहर आणि त्याची लव्हस्टोरी तर चांगलीच गाजली होती. बिग बॉसच्या घरात गौहर आणि कुशल एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. बिग बॉसच्या घरात ते सतत एकत्र वावरत असत. तसेच एकमेकांना खूप सांभाळून घेत असत. त्यामुळे त्या दोघांचे नाते टिकेल असे सगळ्यांना वाटत होते. पण त्या दोघांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर काहीच महिन्यात ब्रेकअप केले. आज त्यांच्या ब्रेकअपला अनेक महिने झाले असले तरी ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. कुशल सध्या बेहद या मालिकेत झळकत आहे. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेत सांझची भूमिका साकारणारी अनेरी वजानी आणि कुशल सध्या नात्यात असल्याचे म्हटले जात आहे. ते दोघे मालिकाच्या सेटवर सतत एकत्र असतात, एकमेकांशी कित्येक तास गप्पा मारत असतात, एकमेकांना जोक्स सांगत असतात, एकमेकांच्या जोक्सवर हसत असतात, तसेच सतत एकमेकांना चिडवत असतात तसेच ते दुपारचे जेवणदेखील एकत्र जेवतात. चित्रीकरणाच्यावेळी ते दोघे एकमेकांपासून थोडा वेळही दूर जात नाहीत. एवढेच नव्हे तर चित्रीकरणानंतरही अनेकवेळा त्यांना एकत्र बाहेर फिरताना पाहाण्यात आले आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये केवळ मैत्री नसून त्यांचे नाते मैत्रीहूनही अधिक घट्ट असल्याचे म्हटले जात आहे. त्या दोघांचे अफेअर सुरू असल्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहेत.