गेल्या आठ वर्षांपासून यशस्वीरित्या छोट्या पडद्यावरील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या बालिका वधू या मालिकेनं अखेर 31 जुलैला रसिकांचा निरोप घेतलाय.बालविवाहसारख्या समाजातील कुप्रथेवर भाष्य करणारी ही मालिका अल्पवधीतच लोकप्रिय ठरली होती.मात्र या मालिकेनं अचानक लीप घेतल्यानं रसिकांचा हिरमोड झाला असं या मालिकेतील अभिनेता रसलान मुमताज यानं म्हटलंय. ही मालिका आणखी वर्षभर सुरु राहिली असती, मात्र मालिका बंद होण्याला तीन चार कारणं जबाबदार असल्याचं त्यानं नमूद केलंय.लीपमुळं बालविवाहसारखा सामाजिक विषय बाजूला राहून मालिकेची कथा पूर्णपणे प्रेमकथेमध्ये बदलली गेली आणि त्यामुळं रसिक मालिकेपासून दुरावल्याचं त्याला वाटतंय.तसंच सुरुवातीच्या बालिका वधूमधील एकही चेहरा यांत नसल्याचा फटकाही मालिकेला बसला.मालिकेत आलेले नवे चेहरे रसिकांशी कनेक्ट होऊ शकले नसल्याची खंतही रसलाननं व्यक्त केलीय.
या कारणांमुळं ‘बालिका वधू’ बंद झाली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 13:39 IST