या कारणामुळे या युट्युब वाहिनीवर भडकली एकता कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 14:58 IST
एकता कपूरने आज छोट्या पडद्यावर तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. एकताच्या मालिका म्हटल्या की, त्या हिट होणारच असेच ...
या कारणामुळे या युट्युब वाहिनीवर भडकली एकता कपूर
एकता कपूरने आज छोट्या पडद्यावर तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. एकताच्या मालिका म्हटल्या की, त्या हिट होणारच असेच म्हटले जाते. क्योंकी साँस भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की, हम पाच या तिच्या मालिकांनी छोट्या पडद्यावर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. एकताच्या अनेक मालिकांनी अनेक वर्षं छोट्या पडद्यावर राज्य केले आहे. पण तिच्या एका मालिकेची सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली असल्यामुळे एकता चांगलीच नाराज झाली आहे. arvid ulf kjellberg नावाच्या एका प्रसिद्ध युट्युब वाहिनीने एकताच्या मालिकेची खिल्ली उडवली आहे. या युट्युब वाहिनीने एकताच्या एका जुन्या मालिकेची लिंक ट्विटरवर शेअर करत गुड क्वॉलिटी असे लिहिले आहे. पण या युट्युब वाहिनीच्या ट्विटर पेजवर ज्या मालिकेची लिंक शेअर करण्यात आली आहे, त्याचा व्हिडिओ खूपच खराब आहे. हे पाहून एकता प्रचंड चिडली. एकताच्या कसम से या मालिकेची लिंक युट्युब वाहिनीला शेअर करण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये आपल्याला कसम से या मालिकेचे शीर्षक गीत पाहायला मिळत आहे. पण तो व्हिडिओ खूपच खराब आहे. तांत्रिक कारणाने व्हिडिओ खराब होऊ शकतो. पण कोणत्याही युट्युब वाहिनीने अशाप्रकारचे ट्वीट करून खिल्ली उडवणे हे चुकीचे आहे असे एकताचे म्हणणे असल्याने तिने या ट्वीटवर जशाच तसे उत्तर दिले. एकताने ट्वीट करून विचारले, भावा, तू कोण आहेस? तू पाश्चिमात्य देशातील ज्युनिअर आर्टिस्ट असशील असेच मला वाटत आहे? अशा अनेक जणांना आम्ही रोज काम देतो. एकताला तिच्या मालिका या अतिशय प्रिय आहेत हेच या ट्वीटवरून कळून येत आहे. कसम से ही मालिका तर एकताच्या यशस्वी मालिकामध्ये एक मानली जाते. ही मालिका प्रेक्षकांना २००६ ते २००९ च्या दरम्यान झी टिव्हीवर पाहायला मिळाली होती. या मालिकेत राम कपूर आणि प्राची देसाई यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेने राम आणि प्राचीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. राम कपूरने कसम से या मालिकेच्या आधी घर एक मंदिर या मालिकेत काम केले होते. पण कसम से ही मालिका त्याच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. Also Read : या कारणामुळे एकता कपूर काम करत नाही शाहरुख खान आणि सलमान खानसोबत