'हर मर्द का दर्द' मालिकेच्या सेटवर यामुळे रंगते चाय पे चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 12:56 IST
सेटवर शूटिंग केल्यानंतर कलाकार ब-याचदा आराम करताना दिसतात. आपल्याला हव्या त्या गोष्टी स्पॉटबॉयच्या मदतीने करताना दिसतात. मात्र ‘हर मर्द ...
'हर मर्द का दर्द' मालिकेच्या सेटवर यामुळे रंगते चाय पे चर्चा
सेटवर शूटिंग केल्यानंतर कलाकार ब-याचदा आराम करताना दिसतात. आपल्याला हव्या त्या गोष्टी स्पॉटबॉयच्या मदतीने करताना दिसतात. मात्र ‘हर मर्द का दर्द’ मालिकेतील विनोद खन्ना शूटिंग दरम्यान स्वत: चहा बनवतो. त्याला चहा खूप आवडतो,मात्र इतरांना त्रास देण्यापेक्षा स्वत: च्या हाताने चहा बनवणे त्याला खूप आवडते. विनोदच्या हाताने बनवलेला चहा त्याच्या सहकलाकरापासूनत स्पॉटबॉय सगळ्यांना आवडतो. त्यामुळे सध्या या चहामुळे सेटवर मस्त चाय पे चर्चाही रंगते.विनोदमुळे सेटवर अगदी खेळीमेळीचे वातावरण असल्याचे सहकलाकार सांगतात. मालिकेच्या सेटवर तो केवळ उत्तम अभिनेता म्हणूनच ओळखला जात नाही, तर तो उत्तम चहा बनवतो, त्यामुळे विनोदला सेटवर उत्तम चहावाला असेही चिडवले जाते.आले, लेमनग्रास, वेलदोडा, मिंट वगैरे घटक घालून अत्यंत सुगंधित चहा बनवायला रशीदला फार आवडते. इतके की सेटवर आजकाल त्याला चायवाला म्हणूनच संबोधले जाते. एके दिवशी रशीदने आपला हा खास चहा सेटवरील सर्वांसाठी- अगदी स्पॉटबॉय ते सहकलाकार यांच्यासाठीही बनविला आणि सर्वांना तो अतिशय आवडला. पण तो सर्वांना पुरेसा झाला नाही आणि काहीजणांना त्याची चव घेता आली नाही. तेव्हा रशीदला तसा चहा पुन्हा बनवावा लागला! या घटनेबद्दल रशीदला विचारले असता त्याने सांगितले, “हो, मी सार््या युनिटसाठी चहा बनविला होता. मी चहाचा शौकीन असून माझ्या मसाला चहाबाबत मी विशेष दक्ष असतो. त्यामुळे माझा चहा रोज मीच बनवितो, कधी कधी मी तो इतरांसाठीही बनवतो आणि त्यात लेमनग्रास, आले, मिंट, वेलदोडा वगैरे पदार्थ टाकतो.”