Join us
Daily Top 2Weekly Top 5

​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत या महिन्यात परतणार दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 12:00 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका आज अनेक वर्षं सुरू असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी ...

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका आज अनेक वर्षं सुरू असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. या मालिकेच्या फॅन्ससाठी दोन गुड न्यूज आहेत. या मालिकेने नुकताच टीआरपीच्या रेसमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. सगळ्या मालिका आणि रिअॅलिटी कार्यक्रमांना मागे टाकत सगळ्यात जास्त पाहिली जाणारी ही मालिका ठरली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका नेहमीच टिआरपीच्या रेसमध्ये पहिल्या दहा कार्यक्रमांमध्ये असते. पण आता या मालिकेने चक्क पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची टीम चांगलीच खूश आहे. पण त्याचसोबत या मालिकेच्या फॅन्ससाठी आणखी एक चांगली बातमी आहे.तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दिशा वाकानी दयाबेन ही भूमिका साकारते. दयाची बोलण्याची स्टाइल, कोणतेही कारण नसताना ती करत असलेला गरबा हे प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यामुळे या मालिकेतील दया ही प्रेक्षकांची सगळ्यात आवडती आहे. पण गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना या मालिकेत दयाबेनला पाहाता येत नाहीये. दयाने काहीच महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे आणि त्यामुळे ती तिचा सगळा वेळ हा तिच्या मुलीसोबतच घालवत आहे. दयाने गरोदर असताना देखील तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे चित्रीकरण केले होते. तिने सप्टेंबर महिन्यापर्यंत या मालिकेसाठी चित्रीकरण केले होते. ही मालिका तिच्यासाठी खूप खास असल्याने तिने हा निर्णय घेतला होता. आता ती मार्च महिन्यात पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करणार असून मार्चनंतर प्रेक्षकांना तिला या मालिकेत पाहायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सुरू असतानाच दिशा वाकानीने मयुर पांड्यासोबत लग्न केले. मयुर हा सी.ए. असून या दोघांचे लग्न २०१५ मध्ये लग्न झाले होते.Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता होती या अभिनेत्यासोबत नात्यात... सततच्या मारहाणीमुळे केले होते ब्रेकअप