Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. निलेश साबळेंची ‘हवा’ संपली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 14:15 IST

छोट्या पडद्यावर सध्या चला हवा येऊ द्या हा शो चांगलाच गाजतोय. अल्पवधीतच या शोनं महाराष्ट्राच्या घराघरातील रसिकांच्या मनात अढळ ...

छोट्या पडद्यावर सध्या चला हवा येऊ द्या हा शो चांगलाच गाजतोय. अल्पवधीतच या शोनं महाराष्ट्राच्या घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. यातील प्रत्येक पात्रास रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे.. या पात्रांसोबत सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे यांनाही चांगली लोकप्रियता मिळू लागली आहे. मात्र या शोमधून डॉ. निलेश साबळे यांची एक्झिट होणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी चला हवा येऊ द्या शोमध्ये फॅन सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खान आला होता. हा भागच डॉ. साबळे यांच्या एक्झिटला कारणीभूत ठरण्याची चिन्हं आहेत. त्यांच्या जागी शोमध्ये अभिनेता प्रियदर्शन जाधवची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.. याला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी याबाबतच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.. दुसरीकडे सध्या या शोच्या सेटवरील हवा दूषित झाल्याची कुजबूज ऐकू येऊ लागलीय.. शोमधील गेल्या काही भागात स्कीटमधील काही कलाकारांचा सहभाग किंवा रोल खूप कमी झाल्याचं रसिकांनाही जाणवतंय. शोच्या सेटवरील हवा बिघडल्याची चर्चा सध्या सर्वत्र ऐकू येऊ लागली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. साबळेंची ‘हवा’ संपल्याचं बोललं जाऊ लागलंय.