Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.गिरीश ओक यांनी दिला प्रेक्षकांना हा महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 07:15 IST

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील निवेदिता सराफ-गिरीश ओक यांच्या जोडीने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे.

झी मराठी वरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे.

या मालिकेतील डॉ.गिरीश ओक यांची सुप्रसिद्ध शेफ अभिजित राजे हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. मालिकेत अभिजीत राजे सगळ्यांना त्यांच्या अभिज किचन या हॉटेलमध्ये चविष्ट पदार्थ खायला देतात पण खऱ्या आयुष्यात देखील गिरीश ओक सेटवरचं चमचमीत खाणं पसंत करतात. त्यांच्या डाएट बद्दल बोलताना डॉ.गिरीश ओक म्हणाले, "मी सुरुवातीपासूनच माझ्या खाण्यावर कंट्रोल ठेवला आहे. अन्न पोटासाठी खावं, जिभेसाठी नाही. एकदा जेवून परत दोन तासांत आपल्या समोर जेवणाचं ताट आलं तर ते परत जेवता आलं पाहिजे.

अर्थात तितकी जागा आपण पोटात ठेवायला हवी अशा मताचा मी आहे. भाज्यांपासून माशांपर्यंत सर्वकाही खायला मला आवडते पण आज अमुक एका पदार्थावर ताव मारूया अशा मताचा मी नाही. मी आजच्या पिढीला आवर्जून सांगेन कि व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करा, अत्यंत डाएट कॉन्शिअस राहा हरकत नाही पण स्वतःच्या तब्येतीकडे बारीक लक्ष असणे खूप गरजेचे आहे."

टॅग्स :गिरिश ओकझी मराठीअग्गंबाई सासूबाई