Join us

म्हणून श्वेताने घातला देवदत्तसह कॉफी डेटचा घाट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 17:33 IST

देवा पहिल्यापासूनच आवडला आहे त्यामुळे त्या त्याला जावई बापू सारखं टारझन बापू म्हणूनच नेहमी हाक मारतात .

डॉक्टर डॉन ही हटके मालिका नुकतीच सुरु झाली आहे.  'फुलपाखरु' , 'लव्ह लग्न लोचा' सारख्या यूथफूल  मालिकांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती . त्याचप्रमाणे 'डॉक्टर डॉन' ही मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री श्वेता शिंदे यांची मेडिकल कॉलेजच्या पार्श्वभूमीवरील प्रत्येकाला वेड लावणारी आणि धमाल मनोरंजन करणारी एक अतिशय हटके लव्हस्टोरी रसिकांना पाहायला मिळत आहे.देवदत्त आणि श्वेता म्हणजेच डॉन देवा आणि डीन मोनिका यांची अचानक भेट होते.

सलूनमध्ये अचानक त्यांचे समोरासमोर येणं , देवाचं मोनिकाच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणं आणि दोघांची प्रत्येकवेळी होणारी शाब्दिक चकमक यामुळे कथानक अनेक वळणं घेत आहे . प्रेमाची ही वळणे नक्की फ्री वे कशी पकडणार याची उत्सुकता रसिकांना झाली आहे . पण ही प्रेम सुरु होण्याआधीची मजा प्रत्येक प्रेमी युगलांनी अनुभवली असतीलच. 

म्हणजे प्रेमात भांडण नसेल तर प्रेम कसले ? देवा मोनिका ला पाहताक्षणी प्रेमात पडला असला तरी अजूनही हे प्रेम पूर्णपणे परिपकव नाही आणि मोनिकाला तर देवाचा रागच मनात आहे . त्यामुळे यांची ही गोष्ट पुढे नेण्यासाठी आता मोनिकाची आई  मध्ये पडून लव्हगुरूची भूमिका करणार आहेत. त्यांना देवा पहिल्यापासूनच आवडला आहे त्यामुळे त्या त्याला जावई बापू सारखं टारझन बापू म्हणूनच नेहमी हाक मारतात . त्यामुळे आता त्यांनी देवा आणि मोनिकाच्या कॉफी डेट चा घाट घातला आहे . आता ही " कॉफी डेट विथ देवा " या कथानकाला नक्की काय वळण देते हे पाहणे नक्कीच मजेशीर असणार आहे .

टॅग्स :देवदत्त नागेश्वेता शिंदे