नकटीच्या लग्नाला यायचं हं... या मालिकेच्या टीमचा हा ढिचँक डान्स तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 16:04 IST
नकटीच्या लग्नाला यायचं हं... या मालिकेच्या टीमचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सगळेच कलाकार बेफाम होऊन नाचताना दिसत आहेत.
नकटीच्या लग्नाला यायचं हं... या मालिकेच्या टीमचा हा ढिचँक डान्स तुम्ही पाहिला का?
नकटीच्या लग्नाला यायचं हं... ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांनी ती अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. या मालिकेतील प्राजक्ताची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडते. तसेच या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या आहेत. या मालिकेतील नकटीचे लग्न कधी होणार हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. या मालिकेतील नकटीचे लग्न लवकरात लवकर व्हावे अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. नकटीच्या लग्नाला यायचं हं... ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळे या मालिकेची टीम ही एखाद्या कुटुंबियांसारखीच बनली आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांची एकमेकांसोबत खूप चांगली गट्टी देखील जमली आहे. ते चित्रीकरणाच्या वेळी खूप धमाल मस्ती करतात. एवढेच नव्हे तर चित्रीकरणाच्या दरम्यान कधी वेळ मिळाला तर ते मेकअप रूममध्ये डान्सदेखील करतात. असाच या मालिकेच्या टीमच्या डान्सचा एक भन्नाट व्हिडिओ त्यांनी नुकताच फेसबुकवर पोस्ट केला आहे आणि या गाण्यात प्राजक्ता माळी आणि या मालिकेतील सगळेच कलाकार बेफाम होऊन नाचताना दिसत आहे. नकटीच्या लग्नाला यायचं हं... या मालिकेच्या शीर्षकगीतावर ही सगळी मंडळी नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओत प्राजक्तासोबतच अभिजीत आमकर, अभिनय सावंत आणि इतर कलाकार देखील पाहायला मिळत आहे. नकटीच्या लग्नाला यायचं हं... या टीमच्या डान्स व्हिडिओला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २४ हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. Also Read : प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकरची जोडी पुन्हा झळकणार