बॉलिवूड असो वा टीव्ही इंडस्ट्री, अनेक सेलिब्रिटी असे आहेत जे ग्लॅमरस जगात नाव कमावण्यासाठी कठोर परिश्रम करतात. त्यानंतर ते रातोरात स्टारही बनतात. पण अचानक ते इंडस्ट्रीपासून दूर जातात. अशा परिस्थितीत, त्यांचे चाहते हे जाणून घेऊ इच्छितात की त्यांचे आवडते स्टार आता काय करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'दीया और बाती हम'मध्ये सूरज राठीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अनस रशीद. या अभिनेत्याने अनेक वर्षे टीव्ही जगतावर राज्य केले. मात्र, त्यानंतर त्याने सिनेविश्वाला रामराम केला.
अनस रशीद गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय सोडून शेती करत आहेत. अनस आता अभिनेता राहिलेला नाही, तो शेतकरी बनला आहे. त्यामुळे तो आता मुंबईत नव्हे, तर त्याच्या पंजाबमधील मूळ गावी मालेरकोटला येथे राहतो आहे. अभिनेत्याचे संपूर्ण कुटुंब तिथेच राहत आहे.
अनसने अभिनयात 'कहीं तो होगा' मधून पदार्पण केले होते. यानंतर तो 'धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान'मध्ये झळकला होता. अनसने या मालिकेत आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली. या मालिकेतून यश मिळाल्यानंतर अनसला 'दिया और बाती हम'ची ऑफर मिळाली. या मालिकेमध्ये त्याने एका अशिक्षित मिठाईवाला 'सूरज राठी'ची भूमिका साकारली होती.
दीपिका सिंगने मारली होती थप्पडपाच वर्षे 'दिया और बाती हम'मध्ये सलग काम केल्यानंतर अनस लोकप्रिय चेहरा बनले. दीपिका सिंग आणि अनसची जोडी लोकांना खूप आवडली होती. मालिकेत दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री दाखवली गेली असली तरी, खऱ्या आयुष्यात त्यांचे अजिबात पटत नव्हते. रिपोर्टनुसार, एका गैरसमजामुळे दीपिकाने अनसला थप्पडही मारली होती. या घटनेनंतर दोघांनी कधीही एकमेकांशी संवाद साधला नाही. रिपोर्टनुसार, टेलिव्हिजन इंडस्ट्रीला अलविदा करण्यामागे दीपिकासोबतचा हा वाद देखील एक कारण असू शकतो. 'दिया और बाती हम' नंतर अनस कोणत्याही मालिकेत दिसला नाही. ग्लॅमर दुनियेपासून दूर असलेला अनस आता आपल्या कुटुंबासोबत सामान्य जीवन जगत आहे.
Web Summary : Anas Rashid, famed for 'Diya Aur Baati Hum', left acting to farm in his Punjab village. He debuted in 'Kahiin Toh Hoga', gained fame as Sooraj Rathi, and now lives a simple life after a reported dispute with his co-star.
Web Summary : 'दीया और बाती हम' से मशहूर अनस राशिद ने अभिनय छोड़कर पंजाब में खेती करने लगे। 'कहीं तो होगा' से शुरुआत की, सूरज राठी के रूप में प्रसिद्धि पाई, और अब सह-कलाकार के साथ विवाद के बाद सादा जीवन जी रहे हैं।