Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओळखलंत का या चिमुकलीला?, बाबांच्या कडेवर असलेली ही मुलगी आहे आज गाजवतेय छोटा पडदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 15:20 IST

अभिनयाव्यतिरिक्त ती आपल्या सौंदर्यानेही रसिकांना घायाळ करत असते.

गेलेली वेळ कधीच परत येत नाही, फक्त आठवणीच राहतात! पण काही खास क्षण  आपण कॅमेऱ्यात टिपतो. मग जेव्हा जेव्हा ते फोटे समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्या पुढे उभा राहतो. बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर अनेकवेळा व्हायरल होत असतात. अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो पाहून लोक तिला ओळखत नाहीत, कोण आहे  बाबांच्या कडेवर असलेली ही चिमुरडी..तुम्हाला एक हिंट देतो, ही मुलगी आज मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एका अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिसत असलेली चिमुकली अभिनेत्री गिरिजा प्रभू आहे.फोटोत गिरीजा वडिलांच्या कडेवर दिसतेय. 

सध्या गिरिजा सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गौरीची भूमिका साकरते आहे. टाइम प्लीज’ या सिनेमात चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलेलं. अभिनयाबरोबरच तिला नृत्याची पण आवड आहे. गिरिजाचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दोन्ही पुण्यात झालं. गिरिजाला लहानपणापासूनच अ‍ॅक्टिंग आणि डान्सची आवड होती. गिरिजाच्या कुटुंबातून कुणीच या क्षेत्रात नाही. मात्र गिरिजाने डान्स क्लास जॉईन केला. शिवाय उन्हाळी, सुट्टीमध्ये एका शिबिरात सहभाग घेतला. तेव्हा तिने एक नाटक केलेलं. त्या मधून तिचा अ‍ॅक्टिंग मध्ये इंटरेस्ट वाढला मग डबिंगचा गिरिजाने कोर्स केला आणि मग त्यानंतर तिने हळूहळू आॅडिशन द्यायला सुरुवात केली.

 कौल मनाचा, काय झालं कळंना , सेंट मेरी मराठी मिडीयम, डॅड चिअर्स , तुझा दुरावा हे तिचे काही गाजलेले चित्रपट. याबरोबरच तिने मालिकांमध्ये छोट्या छोट्या  भूमिका आणि एक शॉर्ट फिल्म सुद्धा केली आहे. गिरीजाने ‘टा ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिअ‍ॅलिटी शो मध्ये तिने भाग घेतला होता.

टॅग्स :टिव्ही कलाकार