Join us

झोपाळ्यावर बसलेल्या या चिमुकलीला ओळखलंत का?, छोट्या पडद्यावरील आज आहे प्रसिद्ध चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 16:12 IST

मराठी टीव्ही जगतातील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे.

बालपणीचा काळ सुखाचा असं कायमच म्हटलं जातं. आपण किती मोठे झालो तरी प्रत्येकालाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला आवडते. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. आजवर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. तुफान लोकप्रियता मिळविली आहे. मात्र आजही ते त्यांच्या बालपणींच्या आठवणींमध्ये रमतात. तसेच सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे ही कलाकार मंडळी बऱ्याचवेळा आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत असतात. मराठी टीव्ही जगतातील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एका अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला होता. सध्या ही चिमुकली महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेतील मुख्य चेहरा आहे. अजून तुम्ही ओळखलं नसलं तर आम्ही तुम्हाला सांगतो ही मुलगी अभिनेत्री ईशा डे आहे.  

ईशाने लंडनमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. तिनं ‘सुखी माणसाचा सदरा’ व ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.  बॉबी देओलच्या ‘आश्रम 3’ या वेब सीरिजमध्येही ईशा झळकली होती. 

टॅग्स :टिव्ही कलाकार