Join us

बायकोचे शो पाहत नाही 'थंगाबली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 13:34 IST

'चेन्नई एक्स्प्रेस' सिनेमातील थंगाबली अर्थातच निकितन धीर टीव्ही पुनरागमन करत आहे. लवकरच तो 'नागार्जुन: एक योद्धा' मालिकेत झळकणार आहे. ...

'चेन्नई एक्स्प्रेस' सिनेमातील थंगाबली अर्थातच निकितन धीर टीव्ही पुनरागमन करत आहे. लवकरच तो 'नागार्जुन: एक योद्धा' मालिकेत झळकणार आहे. यापूर्वी त्याने 'फिअर फॅक्टर: खतरो के खिलाडी', (मार्च-मे 2014) शोमध्ये स्पर्धक म्हणून काम केले होते. 'नागार्जुन' निमित्त माध्यमांशी संवाद साधताना निकितनने लग्न आणि पत्नी कृतिकाविषयी बातचीत केली. जेव्हा त्याला विचारण्यात आले, की तो कृतिकाची 'कसम' मालिका पाहतो का? यावर तो म्हणाला, 'मी माझ्या बायकोला दुस-या व्यक्तीसोबत रोमान्स करताना पाहू शकत नाही. म्हणून मी तिचे शो पाहतच नाही.'