Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना आना इस देस लाडो 2 या मालिकेला मिळणार हे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 11:58 IST

ना आना इस देस लाडो ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेने जवळजवळ तीन-चार वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मेघना ...

ना आना इस देस लाडो ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेने जवळजवळ तीन-चार वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मेघना मलिक यांची या मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली होती. ना आना इस देस लाडो या मालिकेची लोकप्रियता पाहाता ना आना इस देस लाडो या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.ना आना इस देस लाडो या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील प्रेक्षकांना मेघना मलिकला मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या सिझनमधील त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडत असल्याचे प्रेक्षक आवर्जून सांगतात. या मालिकेत देखील त्या अम्माजीची भूमिका साकारत आहेत. अम्माजी यांचे निधन झाल्याचे मालिकेत दाखवले जाणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. त्यामुळे प्रेक्षकांची लाडकी मेघना मलिक ही मालिका सोडणार असल्याने तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. पण आता या मालिकेत अम्माजी जिवंत असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये युवराज अनुष्काच्या समोरच अम्माजीला मारणार आहे. हे सगळे पाहून अनुष्का प्रचंड घाबरणार आहे. आपल्या आजीची ही अवस्था पाहून काय करायचे हे तिला सुचणार नाहीये. पण त्याचवेळी जय देव आणि सरोजा तिथे येऊन अम्माजींना रुग्णालयात घेऊन जाणार आहेत. पण रुग्णालयात बलवंतची प्रचंड दहशत असल्याने कोणतेच डॉक्टर अम्माजींवर उपचार करायला तयार होणार नाहीत. बलवंत रुग्णालयाचा ट्रस्टी असल्याने सगळेच डॉक्टर त्याला प्रचंड घाबरत आहेत. पण त्याचवेळी अनुष्काचा एक मित्र तिथे त्यांना भेटणार आहे. हा त्या रुग्णालयात डॉक्टर असला तरी तो अम्माजींवर उपचार करायला तयार होणार आहे. पण त्यांना तपासल्यावर त्यांचे निधन झाल्याचे तो सांगणार आहे. आपल्या आजीच्या निधनाची बातमी ऐकून अनुष्का पूर्णपणे तुटणार आहे. ती आपल्या आजीला घट्ट मिठी मारून रडणार आहे. पण घट्ट मिठी मारल्याने अम्माजींचा श्वासोच्छवास पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे आता अम्माजी वाचतात की त्यांचा मृत्यू होतो हे प्रेक्षकांना काहीच दिवसांत कळणार आहे.Also Read : रिअल लाइफमध्ये इतकी ग्लॅमरस दिसते छोट्या पडद्यावरची 'अम्माजी'!