'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ज्ञानदाने हर्षद आत्मारामसोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पारंपरिक पद्धतीने नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. ज्ञानदा आणि हर्षद यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. चाहते आणि सेलिब्रिटींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
लग्नासाठी ज्ञानदाने मराठमोळा पारंपरिक लूक केला होता. नऊवारी नेसून ती नटली होती. मोत्याचे पारंपरिक दागिने घातल्याने ज्ञानदाचा लूक आणखीनच खुलून दिसत होता. तर हर्षदने धोतर आणि कुर्ता परिधान केला होता. वरमालासाठी ज्ञानदाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर हर्षदने सूट घातला होता. त्यांच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ज्ञानदाचा नवरा हर्षद हादेखील कलाविश्वात कार्यरत आहे. हर्षद एक सिनेमेटोग्राफर आहे. २०१५ मध्ये एका शॉर्टफिल्मच्या शूटिंगदरम्यान ते पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळेस हर्षद मुंबईत राहत नव्हता. इथूनच एका सुंदर नात्याची गुंफण सुरू झाली.त्यानंतर त्यांच्यामध्ये ओळख निर्माण झाली. २०१९ मध्ये हर्षदने ज्ञानदाला प्रपोज करत त्याच्या मनातील भावना सांगितल्या. आता लग्न करत दोघांनीही कायम सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Web Summary : Actress Gyanada Ramteerthkar, known for 'Lagnalnantar Hoilch Prem,' married Harshad Atmaram in a traditional ceremony. Photos show Gyanada in a traditional Marathi look. The couple met in 2015 and Harshad proposed in 2019. Both are active in the film industry.
Web Summary : 'लग्नानंतर होईलच प्रेम' की अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ने हर्षद आत्माराम के साथ पारंपरिक समारोह में शादी कर ली। तस्वीरों में ज्ञानदा पारंपरिक मराठी लुक में दिख रही हैं। यह जोड़ी 2015 में मिली थी और हर्षद ने 2019 में प्रपोज किया था। दोनों फिल्म उद्योग में सक्रिय हैं।