दिव्यांका थोडक्यात वाचली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:23 IST
ये है मोहोब्बते या मालिकेतील इशिता म्हणजेच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या कारला नुकताच अपघात झाला. या अपघातामध्ये मी थोडक्यात वाचली ...
दिव्यांका थोडक्यात वाचली
ये है मोहोब्बते या मालिकेतील इशिता म्हणजेच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या कारला नुकताच अपघात झाला. या अपघातामध्ये मी थोडक्यात वाचली असे दिव्यांका सांगते. दिव्यांका सुरतवरून मुंबईला येत असताना हा अपघात घडला. याविषयी दिव्यांका सांगते, "सुरतमध्ये एका गरबाच्या कार्यक्रमासाठी मी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मी रात्री माझ्या स्पॉट बॉयसोबत एका प्रायव्हेट कारने परतत असताना माझ्या गाडीला अपघात झाला. मला काही कळायच्या आतच जोरात आवाज आला आणि माझी गाडी डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतात घुसली. पण रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर गाड्या खूप कमी होत्या. त्यामुळे एक मोठा अपघात टळला. आमचे भाग्य चांगले असल्यामुळे आम्हाला कोणालाच लागले नाही. गाडी चालवताना ड्रायव्हरला काही क्षणासाठी झोप लागल्यामुळे हा अपघात घडला होता. या अपघातानंतर मी काही क्षण खूपच घाबरले होते. या अपघातूतन मला वाचवल्याबद्दल मी देवाचे आभार मानले."