Join us
Daily Top 2Weekly Top 5

नीरा बॅनर्जीचा 'दिव्य दृष्टी'मधील वधू लूक 'पद्मावत'मधील दीपिका पादुकोणसारखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 06:30 IST

'दिव्य दृष्टी' या मालिकेत दिव्या (नीरा बॅनर्जी) आणि रक्षित (आध्विक महाजन) हे प्रेमीयुगुल लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत.

स्टार प्लस वाहिनीवरील 'दिव्य दृष्टी' या मालिकेत भविष्यातील घटना पाहता येणे आणि त्यात बदल घडविता येणे अशी अद्भुत शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा सादर केली आहे. आता या कथानकाने एक वेगळेच वळण घेतले असून दिव्या (नीरा बॅनर्जी) आणि रक्षित (आध्विक महाजन) हे प्रेमीयुगुल लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत.

या दोघांच्या विवाहाच्या प्रसंगाचे नेपथ्य पाहिल्यास कोणीही प्रेक्षक त्याच्या प्रेमात पडेल, इतके ते सुंदर आहे. त्यातील वधू दिव्याचा (म्हणजे नीरा बॅनर्जी) पोशाख तर अगदी डोळे दिपविणारा आहे कारण 'पद्मावत' चित्रपटातील दीपिका पादुकोण हिच्या वेशभूषेवरच तो आधारित आहे. विवाहाच्या दिवशी राजेशाही मोठे अलंकार आणि भरजरी लेहेंगा घातलेली नीरा ही वधूच्या वेशात तर फारच सुंदर दिसते. आपल्या या सुंदर पत्नीला या वेशात पाहिल्यावर रक्षित तिच्या पुन्हा एकदा प्रेमात पडेल, यात शंकाच नाही.मालिकेच्या निर्मात्यांशी निकटचे संबंध असलेल्या सूत्रांनी सांगितले, यातील दिव्याला वधूच्या वेशात तयार करण्यासाठी खूप चर्चा करण्यात आली. तिचा अंतिम पोशाख निश्चित करण्यापूर्वी 10 वेगवेगळ्या पोशाखांमध्ये तिची चाचणी घेण्यात आली. पण ते सर्व वेश निकालात काढण्यात आले आणि शेवटी 'पद्मावत'मधील दीपिकासारख्या वेशाची निवड करण्यात आली. 

टॅग्स :स्टार प्लस