Join us
Daily Top 2Weekly Top 5

दणक्यात पार पडलं दिव्यांका त्रिपाठीचं बेबी शॉवर, विवेक दहियाने केला जबरदस्त डान्स परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 10:02 IST

Divyanka tripathi: लग्नानंतर तब्बल १० वर्षानंतर दिव्यांकाला मातृत्वाचं सुख लाभणार आहे. त्यामुळे सध्या तिच्या घरी आनंदाचं वातावरण आहे.

छोट्या पडद्यावरील इशि माँ अर्थात अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी खऱ्या आयुष्यातही लवकरच आई होणार आहे. ये हैं महोब्बते या मालिकेच्या माध्यमातून नावारुपाला आलेली दिव्यांका सध्या तिचा प्रेगन्संसी काळ एन्जॉय करत असून नुकतंच तिचं बेबीशॉवर पार पडलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात दिव्यांकाचा पती आणि अभिनेता विवेक दहिया याने तर जबरदस्त डान्स परफॉर्मन्सही केला. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

लग्नानंतर तब्बल १० वर्षानंतर दिव्यांकाला मातृत्वाचं सुख लाभणार आहे. त्यामुळे सध्या तिच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. यामध्येच तिने आयोजित केलेल्या बेबी शॉवरमध्ये कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावत तिचा आनंद द्विगुणित केला. 

या कार्यक्रमात दिव्यांकाने सिंपल लूक केला होता. तिने पांढऱ्या रंगाचा फ्लोई गाऊन परिधान केला होता. सोबतच हाफ पिनअप करुन हेअर स्टाइल केली होती. या लूकला साजेशी ज्युलरीदेखील तिने घातली होती. तिचा हा लूक चेहऱ्यावरील प्रेग्नंसी ग्लोमुळे आणखीनच खुलून दिसत होता.

या कार्यक्रमात कलाकारांनी बरीच मज्जा-मस्ती केली. आलेल्या पाहुण्यांसाठी खास गेम्स ठेवण्यात आले होते जे प्रत्येकाने एन्जॉय केले. इतकंच नाही तर विवेक दहियाने सुद्धा जोरदार डान्स परफॉर्मन्स करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. दिव्यांकाच्या या सोहळ्यामध्ये ये हैं महोब्बतेच्या संपूर्ण स्टारकास्टने हजेरी लावली होती. यात रुहानिका धवन(रुही), श्रद्धा आर्या, एकता कपूर, संदीप सिकंद यांसारखे कलाकार उपस्थित होते.

दरम्यान, लग्नानंतर जवळपास १० वर्षानंतर दिव्यांका आई होणार आहे. सध्या ती ४१ वर्षांची असून तिच्या या प्रेग्नंसीची नेटकऱ्यांमध्ये विशेष चर्चा रंगली आहे. दिव्यांका आणि विवेकने २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली होती. ये हैं महोब्बते या मालिकेच्या सेटवरच या जोडीची एकमेकांसोबत ओळख झाली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Divyanka Tripathi's baby shower celebrated; Vivek Dahiya delivers dance performance.

Web Summary : Divyanka Tripathi, famed as Ishi Maa, celebrated her baby shower with husband Vivek Dahiya performing a dance. After 10 years of marriage, the couple are expecting their first child. The 'Yeh Hai Mohabbatein' cast, including Ekta Kapoor, attended the event.
टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीसेलिब्रिटीटेलिव्हिजन