Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीच्या हॉट कपलचा बाथटब रोमान्स! तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 11:46 IST

सध्या स्टार प्लस या वाहिनीवरची ‘दिव्यदृष्टी’ हा मालिका प्रचंड चर्चेत आहेत. मालिकेत एकापाठोपाठ एक असे अनेक ट्विस्ट येत असतानाच आता या मालिकेतील रकपलवर चित्रीत बाथटब सीन लीक झाला आहे.

ठळक मुद्दे दिव्य दृष्टी या मालिकेत दोन बहिणींची कथा सांगण्यात आली आहे. त्यातील एका बहिणीचे नाव दिव्य तर  दुसऱ्या बहिणीचे नाव दृष्टी असते. या दोन्ही बहिणींकडे सुपर नॅचरल पॉवर असतो.

सध्या स्टार प्लस या वाहिनीवरची ‘दिव्यदृष्टी’ हा मालिका प्रचंड चर्चेत आहेत. मालिकेत एकापाठोपाठ एक असे अनेक ट्विस्ट येत असतानाच आता या मालिकेतील रक्षित (आद्विक महाजन) आणि दृष्टी (सना सय्यद)यांच्यावर चित्रीत बाथटब सीन लीक झाला आहे. सध्या या रोमॅन्टिक सीनचे दोन व्हिडीओ वेगोन व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दृष्टी काळ्या साडीत बाथटबमध्ये बसलेली दिसते. तर रक्षितने पांढ-या रंगाचा कुर्ता घातला आहे. एका चाहतीने हे दोन्ही रोमँटिक व्हिडिओ शेअर केले आहेत.

सीनच्या बॅकग्राऊंडमध्ये बॉलिवूड गाणी ऐकू येत आहेत. यात रक्षित आणि दृष्टी यांचा किसिंग सीनही दाखवण्यात आला आहे. मालिकेत रक्षित आणि दृष्टी अर्थात आद्विक व सना पती- पत्नीच्या भूमिकेत आहेत.

ही मालिका त्याच्या विचित्र कथानकामुळेही चर्चेत आहे. अभिनेत्री मानसी श्रीवास्तवच्या व्यक्तिरेखेला अचानक पाल बनवण्यात आले आहे. पाल होऊन मानसीला रक्षितला दंश करून मारण्याचा हेतू असतो. यावरून या मालिकेवर टीकाही झाली होती. एक व्यक्ती अचानक पाल बनते, ही गोष्ट फार हास्यास्पद असल्याचे मत प्रेक्षकांनी नोंदवले होते. दिव्य दृष्टी या मालिकेत दोन बहिणींची कथा सांगण्यात आली आहे. त्यातील एका बहिणीचे नाव दिव्य तर  दुसऱ्या बहिणीचे नाव दृष्टी असते. या दोन्ही बहिणींकडे सुपर नॅचरल पॉवर असतो.

टॅग्स :दिव्य दृष्टीस्टार प्लस