Join us

पालक बनण्याची दिव्यांका आणि विवेक यांची अद्याप तयारी नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 14:07 IST

अतिशय लोकप्रिय असलेल्या टीव्हीवरील सेलिब्रिटींच्या जीवनाची झलक पाहण्याची संधी येत्या 5 मेपासून ‘झी टीव्ही’वर सुरू होत असलेल्या ‘जजबात… संगीन ...

अतिशय लोकप्रिय असलेल्या टीव्हीवरील सेलिब्रिटींच्या जीवनाची झलक पाहण्याची संधी येत्या 5 मेपासून ‘झी टीव्ही’वर सुरू होत असलेल्या ‘जजबात… संगीन से नमकीन तक’ या नव्या चॅट शोमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहे. आज लोकप्रियता आणि मान-सन्मान प्राप्त केलेल्या या सेलिब्रिटींना येथपर्यंत पोहोचण्यासाठी कोमता संघर्ष करावा लागला, त्यांच्या जीवनातील आनंदाचे, दु:खाचे, यशाचे आणि अपयशाचे क्षण कोणते वगैरे गोष्टींची चर्चा करून सूत्रधार राजीव खंडेलवाल या सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस रूपामागे दडलेल्या माणसाची ओळख प्रेक्षकांना करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.येत्या रविवारी टीव्ही मालिकांतील सर्वात लाडके दाम्पत्य असलेल्या दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दाहिया यांच्याशी राजीव खंडेलवाल गप्पा मारताना प्रेक्षकांना दिसेल. या गप्पांमधून या सेलिब्रिटींची काही गुपिते तर उघड होतीलच, पण त्यांच्या मनात खोलवर दडलेल्या ख-या भावभावनाही प्रेक्षकांसमोर उघड होतील.आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनुभवलेल्या काही घटना आणि अनुभवांवर दिव्यांका-विवेक यांनी प्रकाश टाकला, आणि लवकरच आपल्या प्रेमजीवनातील काही घटनाही उघड सांगितल्या. त्यांच्यादरम्यान प्रेमाचा अंकुर उमलल्यापासून त्यांच्या बहुप्रतीक्षित विवाहापर्यंत या दाम्पत्याने एकमेकांबद्दल वाटणा-या अतीव प्रेमाच्या भावनेवर कधी उघडपणे, तर कधी संकोचत भाष्य केले आणि आपण विवाहाचा निर्णय का घेतला, त्याचीही कारणे सांगितली. लवकरच अपेक्षेप्रमाणे या गप्पा त्यांच्या भावी जीवनाविषयी आणि अपत्याविषयी त्यांच्या योजनांवर येऊन ठेपल्या.विवेकने अलीकडेच त्या दोघांचे एक छायाचित्र प्रसृत केले होते, ज्यात हे दोघेजण त्यांच्या मित्राच्या मुलाच्या बोरन्हाण कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत होते. यानंतर या दोघांनी आपले मूल कधी जन्माला घालायचे, याचा निर्णय घेतला आहे का, हा प्रश्न आपसूकच उपस्थित झाला. राजीवने यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिव्यांकाने सांगितले, “अपत्यजन्म ही फार मोठी जबाबदारी असून ती उचलण्यास विवेक आणि मी अजून तयार झालेलो नाही.”या दाम्पत्याच्या मनातील खोलवर दडलेल्या भावनांना बाहेर काढण्यावर आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात या दाम्पत्याने मिळविलेल्या अपूर्व यशावर या गप्पा रंगत गेल्या आणि यादरम्यान निर्माण झालेल्या काही हलक्याफुलक्या क्षणांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजनही केले.