Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नकुशी' चा टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 18:24 IST

टीव्ही मालिकांची शहरी वातावरणाची चौकट मोडून वेगळा प्रवाह प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'नकुशी.. तरीही हवीहवीशी' या नव्या मालिकेचा टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

टीव्ही मालिकांची शहरी वातावरणाची चौकट  मोडून वेगळा प्रवाह प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'नकुशी.. तरीही हवीहवीशी' या नव्या मालिकेचा टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या टीजरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अलीकडच्या काळात टीव्ही मालिकांतून गावगाड्याचं चित्रण झालेलं नाही. ती उणीव 'नकुशी.. तरीही हवीहवीशी'या मालिकेतून भरून निघणार आहे. प्रदर्शित केलेल्या या छोट्या टीजरमधूनच मालिकेचं वेगळेपण जाणवत आहे. हा टीजर पाहून मालिका सामाजिक पार्श्वभूमीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या लक्षवेधी टीजरमुळे मालिकेची कथा, कलाकार या विषयीची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली आहे.