Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dipika Kakar : सावधान! दीपिका कक्करची फसवणूक; अभिनेत्रीने Video शेअर करून सांगितला 'तो' स्कॅम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 16:20 IST

Dipika Kakar : दीपिका कक्करने आपल्या लेटेस्ट व्लॉगमध्ये सांगितलं की, गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्यासोबत एक फसवणूक झाली आहे.

अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांना एक गोड मुलगा झाला आहे. रुहान असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. या सेलिब्रिटी जोडप्याने गेल्या महिन्यात चाहत्यांना त्यांचा मुलगा रुहानची ओळख करून दिली. दोघेही अनेकदा त्यांच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी सोशल मीडियाद्वारे सांगतात आणि चाहत्यांनाही त्यामध्ये खूप रस असतो. नुकताच दीपिका कक्करने तिचा असाच एक धक्कादायक अनुभव सांगितला जो कोणाचीही चिंता वाढवू शकतो.

दीपिका कक्करने आपल्या लेटेस्ट व्लॉगमध्ये सांगितलं की, गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्यासोबत एक फसवणूक झाली आहे. तिला तिच्या चाहत्यांना याबद्दल सांगायचे होते आणि लोकांना सतर्क करायचे होते. अभिनेत्री म्हणाली, "जवळपास 3-4 दिवसांपूर्वी माझ्या घरी एक पार्सल आलं होतं आणि त्यांनी मला मॅडम, ही तुमची कॅश ऑन डिलिव्हरी आहे असं सांगितलं, मी माझ्यासाठी तर कधी रुहानसाठी ऑनलाईन वस्तू ऑर्डर करत असते."

दीपिकाने पैसे देऊन पार्सल घेतलं. तिचे नाव, पत्ता आणि संपर्क तपशील सर्व बरोबर होते पण जेव्हा तिने ते पार्सल उघडून पाहिलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिने ऑर्डर केलेली ही वस्तू नाही. पुढील काही दिवस तिला अशी अनेक पार्सल मिळत राहिली पण तिने ती स्वीकारण्यास नकार दिला. डिलिव्हरी एजंटने तिला सांगितले की तिसा कॅन्सल केलेला OTP शेअर करायचा आहे.

दीपिका अनेकांशी या विषयावर बोलली तेव्हा तिला कळलं की हा एक स्कॅम आहे. जिथे आयटम डीफॉल्ट ऑर्डर केले जातात आणि कॅश ऑन डिलिव्हरीसाठी येत असतात. डिलिव्हरी एजंटने विचारलेला ओटीपी शेअर करू नये, असंही तिने सांगितलं. तिला एका दिवसात अनेक पार्सल मिळाले जे तिने परत केले आणि OTP शेअर करण्यासही नकार दिला. त्यानंतर डिलिव्हरी एजंटने गेला. 

 

टॅग्स :दीपिका कक्कर