'ससुराल सिमर का' फेम टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर पुन्हा एकदा आरोग्याच्या समस्यांमुळे चर्चेत आली आहे. मे २०२५ मध्ये तिला यकृताच्या कर्करोगाचे (लिव्हर कॅन्सर) निदान झाले होते. तेव्हा १४ तासांची मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता तिच्या पोटात एक लहान गाठ (सिस्ट) आढळली असून, पती शोएब इब्राहिमने यूट्यूब व्लॉगद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली. येत्या मंगळवारी दीपिकावर एक छोटी वैद्यकीय प्रक्रिया केली जाणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दीपिकाला पोटात आणि खांद्याला तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे २१ फेब्रुवारी रोजी तिला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमध्ये १.३ सेंटीमीटरची एक छोटी सिस्ट दिसून आली. विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये झालेल्या पीईटी स्कॅनमध्ये ही सिस्ट नव्हती त्यामुळे दोघेही काहीसे चिंतेत आहेत. मात्र, डॉक्टरांनी सांगितले आहे की इतर सर्व रिपोर्ट्स सामान्य असून घाबरण्याचे कोणतेही मोठे कारण नाही.
दीपिकाचा यापूर्वीचा ट्यूमर अत्यंत आक्रमक असल्याने, आजार पुन्हा बळावण्याच्या भीतीने हे कपल चिंतेत आहे. शोएबने स्पष्ट केले की, यावेळी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया होणार नाही, तर एका छोट्या प्रक्रियेद्वारे ही सिस्ट 'बर्न' केली जाईल. दीपिकाला ३-४ दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. जर या सिस्टचा आकार २ सेंटीमीटरपेक्षा जास्त असता, तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकली असती असंही त्याने सांगितलं.
या कठीण प्रसंगी दीपिका भावूक झाली असून तिने चाहत्यांना प्रार्थनेचे आवाहन केले आहे. "कोणत्याही लहान वेदनांकडे दुर्लक्ष करू नका आणि नियमित तपासणी करत राहा," असा सल्ला तिने आपल्या चाहत्यांना दिला आहे. तिच्या उपचारांच्या पद्धतीत आता बदल होऊ शकतो, जिथे ओरल कीमोथेरपीऐवजी इम्युनोथेरपी सुरू केली जाऊ शकते. या कठीण काळात शोएब आणि दीपिकाने गंभीर आजारांशी लढणाऱ्या इतर रुग्णांसाठीही सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
Web Summary : Actress Deepika Kakkar, previously treated for liver cancer, is hospitalized again. A small cyst was found. Husband Shoaib informed fans, requesting prayers. A minor procedure is planned.
Web Summary : अभिनेत्री दीपिका कक्कर, जिनका पहले लीवर कैंसर का इलाज हुआ था, फिर अस्पताल में भर्ती हैं। एक छोटा सिस्ट मिला है। पति शोएब ने प्रशंसकों को सूचित किया और प्रार्थना करने का अनुरोध किया। एक छोटी प्रक्रिया की योजना है।