Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम पूजा ठोंबरे ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’मधून आली भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 17:04 IST

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम पूजा ठोंबरे घराघरात पोहचली.

गावाच्या पारापासून ते मेट्रो सिटीच्या कॅफेपर्यंत कुठेही कट्टा टाकणाऱ्या कोणत्याही तरुण तरुणींच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्या सारख्याच आणखी तीन मुलभूत गरजा म्हणजे, रिलेशनशिप स्टेट्स, करियरचा सक्सेस आणि वाय फायचा स्पीड. यात रिलेशनशिप स्टेट्स सिंगल आहे की कमिटेड याचा परिणाम करियरवर व्हायला वेळ लागत नाही आणि वाय फाय स्पीडवरच तर तुम्ही सिंगलचे कमिटेड होणार की नाही, हे ठरत असतं. आजच्या तरुणाईला आपलेच वाटतील असे सचिन, सायली आणि सुरेखा या एकमेकांचे घट्ट दोस्त असणारे आणि त्याच बरोबर एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे तिघेजण तुम्हाला भेटतील ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ या स्टोरीटेल मराठीच्या नव्या कोऱ्या करकरीत ऑडीओ सिरीजमध्ये. या ऑडीओ सिरीजला आवाज दिला आहे गुणी अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि उत्तम लेखक आणि अभिनेता असणाऱ्या साईनाथ गणुवाड याने. 

माधवी वागेश्वरीने ही ऑडीओ सिरीज खास स्टोरीटेल मराठीसाठी लिहिली आहे. या आधी देखील ‘करसाळ’ ही स्टोरीटेल मराठीसाठी पहिली मल्टी व्होईस सिरीज तिने लिहिली होती, ज्याकडे वेगळा प्रयोग म्हणून पाहिलं गेलेलं आहे.

 ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ या सिरीजसाठी पूजा आणि साईनाथ यांनी विशेष मेहनत घेतली आहे. ही गोष्ट मराठवाडा आणि पुणे अशा दोन ठिकाणी घडते, त्यामुळे त्या त्या व्यक्तिरेखांचे आवाज, भाषेचे बारकावे समजून उमजून घेऊन त्याच बरोबर गोष्ट वाचनातून वेगवान ठेवण्याचे काम त्यांनी एकमेकांच्या मदतीनं पेलेलं आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री पूजा ठोंबरे म्हणाली "जेव्हा मी ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ची संहिता ऐकली तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडले. एकाच सीरिजमधल्या खूप साऱ्या पात्रांना मला आवाज द्यायचा हे समजल्यावर मी अधिकच उत्साही होते. त्या पात्रांचे व्हेरिएशन्स, त्यांच्यातील डिटेलिंग, बारीक बारीक बारकाव्यांचे निरीक्षण नोंदवून त्या व्यक्तिरेखा फुलवण्याचा मी प्रयत्न केलाय. या मालिकेत एकाचवेळी माझ्यापेक्षा कमी वयाची मुलगी’ सुरेखा’चं पात्र वाचलंय आणि त्याचवेळी मी तिच्या आईचंही पात्र वाचलंय. त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी अद्भुत होत, हा अनुभव मी पहिल्यांदाच घेतलाय. माधवी वागेश्वरीने ही मालिका फारच अप्रतिम लिहिली आहे."