Join us
Daily Top 2Weekly Top 5

​जेवणावरून निर्माण झाला पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 12:07 IST

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच सोनाक्षी आणि देव यांचे लग्न पाहायला मिळणार आहे. सोनाक्षी ...

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच सोनाक्षी आणि देव यांचे लग्न पाहायला मिळणार आहे. सोनाक्षी आणि देवच्या फॅन्ससाठी ही खूपच चांगली बातमी आहे. पण या दोघांच्या लग्नात खूप साऱ्या समस्याही निर्माण होणार आहेत. सोनाक्षीच्या घरात लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. लग्नाला जेवण काय ठेवायचे याबाबतही सध्या चर्चा सुरू आहे. सोनाक्षी ही बंगाली असल्याने लग्नाला मांसाहारी जेवण असावे असे सोनाक्षीच्या आईचे म्हणणे आहे तर देव हा शाकाहारी असल्याने त्याच्या आईला हे पटत नाहीये. त्यामुळे लग्न बंगाली पद्धतीने करूया पण जेवणात शाकाहारी जेवण ठेवूया असे देवने सोनाक्षीच्या घरातल्यांना सांगितले आहे. तसेच लग्नाच्या पार्टीला तुम्ही मांसाहारी जेवण ठेवा असे देवने त्यांना सुचवले आहे. पण यामुळे इश्वरीला चांगलाच धक्का बसला आहे. या गोष्टीमुळे देव आणि इश्वरीमध्ये काही भांडणे होतात का हे पाहाणे नक्कीच मजेशीर ठरणार आहे.