Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या नवऱ्याला पाहिलंत का?, दिसायला आहे खूपच हँडसम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 11:37 IST

मृणाल आणि नीरजने 25 फेब्रुवारी 2016 ला दोघांनी लग्न केले.

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) घराघरात पोहचली. त्यानंतर तिने 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेत काम केले. 'अस्सं सासर सुरेख बाई' मालिका अर्ध्यात सोडून तिने सिनेइंडस्ट्रीतून काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ती पुन्हा 'हे मन बावरे' मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती.

त्यानंतर ती बराच मोठा कालावधी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून गायब झाली होती. मात्र मृणाल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

मृणालच्या लग्नाचा आज सहा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिने पतीसाठी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट लिहिली आहे, माझ्या प्रेमळ, काळजी घेणाऱ्या आणि मला समजून घेणाऱ्या नवऱ्याला लग्नाच्या ६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. या सहा वर्षात तू मला खूप काही दिलं आहेस तेही माझ्याकडून कुठल्याही अपेक्षा न ठेवता. असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. मृणाल आणि निरजसाठी हे वर्ष खूप खास आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी बाळाच्या आगमनाची उत्सुकता असल्याचेही ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते आहे. 

मृणाल आणि नीरज लवकरच आई-बाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वी मृणालने सोशल मीडियावर गुडन्यूज शेअर केली होती. मृणाल आणि नीरजने 25 फेब्रुवारी 2016 ला दोघांनी लग्न केले.

अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या नीरज मोरेसह अरेंज मॅरेज पद्धतीने मृणाल लग्नबंधनात अडकली. कांदेपोहेच्या कार्यक्रमात मृणाल आणि नीरज पहिल्यांदा एकमेकांना भेटले. नीरज अमेरिकेतच राहात असून मृणाल काही महिने भारतात तर काही महिने अमेरिकेत राहाते.

टॅग्स :मृणाल दुसानीसटिव्ही कलाकार