Join us

'ठरलं तर मग' मालिकेतील रविराजच्या खऱ्या आयुष्यातील मुलीला पाहिलंत का?, तीदेखील आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 16:16 IST

Sagar Talashikar : 'ठरलं तर मग' या मालिकेत रविराजची भूमिका अभिनेता सागर तळशिकर यांनी केली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, त्यांना तीन मुले आहेत आणि त्यातील एक मुलगी अभिनेत्री आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) गेल्या कित्येक महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल आहे. या मालिकेतील सायली अर्जुन सोबतच इतर पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत रविराजची भूमिका अभिनेता सागर तळशिकर (Sagar Talashikar) यांनी केली आहे. यात सागर यांनी वकिलाची भूमिका साकारली आहे. खरेतर ही भूमिका त्यांच्या खूप जवळची आहे कारण अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर सागर तळशिकर हे वकीली करत होते. फार कमी लोकांना माहित आहे की, त्यांना तीन मुले आहेत आणि त्यातील एक मुलगी अभिनेत्री आहे. 

सागर तळशिकर यांना तीन मुलं असून मृण्मयी आणि आर्जवी या दोन मुली तसेच अंजोर हा मुलगा आहे. सागर तळशिकर यांच्याच पावलावर पाऊल टाकत आर्जवीने मॉडेलिंग क्षेत्रात एन्ट्री केलेली आहे. कॉटन किंगच्या नामांकित ब्रॅण्डच्या जाहिरातीत आर्जवी झळकली असून एका तेलगू चित्रपटासाठी तिने अभिनय केला आहे. 

आर्जवीच्या सौंदर्याची मराठी सेलिब्रिटींनाही भुरळ पडलेली पाहायला मिळते. संयोगीता भावे, राधिका विद्यासागर, सीमा देशमुख, कविता मेढेकर, यांनीही तिच्या दिसण्याचं कौतुक केलेलं पाहायला मिळतं.

आर्जवीने मराठी इंडस्ट्रीत नशीब आजमावे असेही मत सागर तळशिकर यांना चाहत्यांकडून करण्यात येत. ती या इंडस्ट्रीत दाखल झाली तर नक्कीच मोठं यश मिळवू शकेल असा विश्वास त्यांना आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह